IPL 2026 : खेळाडूंची धाकधूक वाढली, आयपीएल रिटेनशन लिस्ट कधी येणार? तारीख ठरली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या सिझनआधी डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शनचं आयोजन केलं जाणार आहे, त्याआधी सर्व 10 टीमना त्यांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे द्यावी लागणार आहे.
मुंबई : आयपीएल 2026 च्या सिझनआधी डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शनचं आयोजन केलं जाणार आहे, त्याआधी सर्व 10 टीमना त्यांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे द्यावी लागणार आहे. ही यादी समोर आल्यानंतर कोणते खेळाडू लिलावामध्ये जाणार, याचा निर्णय होणार आहे. खेळाडूंची रिटेनशन लिस्ट कधी जाहीर होणार, याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे.
कधी येणार रिटेनशन लिस्ट?
आयपीएल 2026 साठी सर्व 10 टीमना त्यांनी रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्यावी लागणार आहे. याच दिवशी खेळाडूंची यादी सार्वजनिक केली जाणार आहे.
किती खेळाडू रिटेन करता येणार?
आयपीएलच्या मागच्याच मोसमात मेगा ऑक्शन झाला होता, तेव्हा सर्व टीमनी खेळाडूंसोबत तीन वर्षांचा करार केला होता. आता या मोसमात मिनी ऑक्शन होणार आहे, त्यामुळे कोणती टीम किती खेळाडू रिटेन करू शकते, यावर मर्यादा नाही.
advertisement
आयपीएल रिटेनशनचे थेट प्रक्षेपण
आयपीएल 2026 साठीच्या रिटेनशनचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाचव्या टी-20 मॅचवेळी याची घोषणा करण्यात आली.
आयपीएल रिटेन्शनचे प्रक्षेपण कोणत्या अॅपवर?
याशिवाय आयपीएल रिटेनशनचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल
आयपीएल ऑक्शन एका दिवसाचा
आयपीएल 2026 साठीचा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लिलाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिनी ऑक्शन असल्यामुळे एका दिवसामध्येच संपूर्ण प्रक्रिया पार पडेल. हा कार्यक्रम भारताबाहेर आयोजित करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे, ज्यात युएई हा प्रमुख पर्याय आहे.
advertisement
आयपीएल 2026 च्या 10 टीम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
चेन्नई सुपर किंग्ज
मुंबई इंडियन्स
सनरायझर्स हैदराबाद
कोलकाता नाईट रायडर्स
पंजाब किंग्ज
दिल्ली कॅपिटल्स
गुजरात टायटन्स
लखनऊ सुपर जायंट्स
राजस्थान रॉयल्स
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 8:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : खेळाडूंची धाकधूक वाढली, आयपीएल रिटेनशन लिस्ट कधी येणार? तारीख ठरली!


