Real Kashmir : कोण आहे बारामुल्लाचा क्रिकेटर? ज्याच्यासाठी काव्या मारन भांडली, 30 लाखाच्या बेस प्राईजवरून 8.40 कोटी खिशात
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बारामुल्लाच्या एका खेळाडूला संघात घेण्यासाठी काव्या मारन भांड भांड भांडली. पण शेवटी दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारून त्याला ताफ्यात घेतलं आहे.त्यामुळे हा खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
IPL Auction 2026 : आयपीएल 2026 चा मिनी लिलाव अबुधाबीमध्ये सूरू आहे. या लिलावात अनपेक्षित असे खेळाडू भाव खाऊन जातायत, तर स्टार खेळाडू अनसोल्ड ठरतायत. अशात देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बारामुल्लाच्या एका खेळाडूला संघात घेण्यासाठी काव्या मारन भांड भांड भांडली. पण शेवटी दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारून त्याला ताफ्यात घेतलं आहे.त्यामुळे हा खेळाडू कोण आहे? हे जाणून घेऊयात.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून जम्मू काश्मीरच्या बारामुल्लाचा वेगवान गोलंदाज आकीब नबी डार आहे. आकीब नबी डार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करतो आहे.त्यामुळे लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन यांनी त्याला संघात घेण्यासाठी उत्सुकता दर्शवली होती.याच खेळाडूला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने देखील उस्तुकता दाखवली होती.
आकीब नबीची बेस प्राईज ही 30 लाख रूपये होती. इथून बोलीला सूरूवात झाली.या खेळाडूला घेण्यासाठी काव्या मारन आणि दिल्ली कॅपिटल्सने उत्सुकता दाखवली.त्यानंतर 30 लाखावरून बोली करोड पोहोचली. शेवटी काव्याने माघार घेतली.त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने 8.4 करोडच्या किंमतीत त्याला ताफ्यात घेतलं. यामुळे काव्या मारनचा हार्टब्रेक झाला होता.
advertisement
आकीब नबीने यावर्षीच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळी केली होती. आकीब नबीने दलीप ट्रॉफी स्पर्धेत 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या.तसेच त्याने या स्पर्धेत डबल हॅट्ट्रीक घेतली होती. रणजीमध्ये देखील त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. रणजी ट्रॉफी 9 सामन्यात आकीब नबीने 29 विकेट घेतल्या आहे. आणि आता सध्या सूरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील 7 सामन्यात त्याने 15 विकेट घेतल्या आहेत.
advertisement
खरं तर जम्मू काश्मीरवर अनेक वेबसीरीज बनतायत.त्यातली बारामुल्ला ही वेबसीरीज प्रचंड चर्चेत आली होती. या सीरीजमध्ये काश्मीर घाटातल्या मुलांच अपहरण करून त्याचं ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी बनवण्याच्या मुद्द्यावर या चित्रपटाची कथा आधारीत आहे. ज्या ठिकाणावर ही कथा आधारीत आहे,तिथून हा आकीब डार येतो.
विशेष म्हणजे रियल काश्मीर नावाची एक वेबसिरीज देखील आहे.यामध्ये काश्मीरमधील तरूण रोजगारासाठी भटकतात.स्थानिक नेते त्यांचा आंदोलन आणि दगडफेकीसाठी वापर करते.त्यानंतर एक फुटबॉल क्लब तयार होतो आणि हा क्लब राष्ट्रीय लीगपर्यंत प्रवास करतो.ज्या तरूणांवर आधारीत ही सीरीज आहे, त्याभागातून आकीब नबी येतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 5:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Real Kashmir : कोण आहे बारामुल्लाचा क्रिकेटर? ज्याच्यासाठी काव्या मारन भांडली, 30 लाखाच्या बेस प्राईजवरून 8.40 कोटी खिशात










