अख्ख्या हंगामात धडकी भरवणारे फायनलला धाडकन् आपटले, कमिन्सची एक चूक महागात; SRHचा डाव कुठे गंडला?

Last Updated:

आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा पाऊस पाडणाऱ्या जोडीला फायनलमध्ये दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.

News18
News18
चेन्नई : आयपीएल २०२४ मध्ये केकेआरने अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादला ८ गडी राखून नमवलं. केकेआरने तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलंय. अख्ख्या हंगामात सनरायजर्स हैदराबादच्या ज्या फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांमध्ये धडकी भरवली त्यांची डाळ केकेआरच्या गोलंदाजीसमोर मात्र शिजली नाही. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सनरायजर्सला विजेतेपदाची संधी होती पण केकेआरविरुद्ध त्यांना कमाल करता आली नाही. पूर्ण हंगामात केकेआरविरुद्ध त्यांनी लीग फेरीसह तीन सामने खेळले. तिन्ही सामन्यात केकेआरने हैदराबादचा पराभव केला.
सनरायजर्सचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कमिन्सच्या या निर्णयाचा फटका सनरायजर्स हैदराबादला बसला. चेपॉकमध्ये एक दिवस आधी पाऊस झाला होता. त्यामुळे केकेआरच्या वेगवान गोलंदाजांचे चेंडू स्विंग होत होते. केकेआरच्या वेगवान माऱ्यासमोर सनरायजर्स हैदराबादची फलंदाजी गडगडली. त्यांचा संघ फक्त ११३ धावाच करू शकला.
advertisement
सनरायजर्स हैदराबादला अंतिम सामन्यात त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांनी धोका दिला. आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा पाऊस पाडणाऱ्या जोडीला फायनलमध्ये दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. ट्रॅव्हिस हेड शून्यावर तर अभिषेक शर्मा फक्त दोन धावा करून बाद झाला. इथंच सनरायजर्स हैदराबादला मोठा धक्का बसला.
मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयशसुद्धा हैदराबादच्या पराभवाला कारणीभूत ठरले. केकेआरने नव्या चेंडूवर आघाडीच्या फलंदाजांना तंबूत धाडल्यानंतर मधल्या फळीतही कोणी टिकाव धरू शकले नाही. पॅट कमिन्स २४ धावाच करू शकला. यामुळे हैदराबादला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही.
advertisement
हैदराबादच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यानंतर गोलंदाजांनीही मोठी निराशा केली. पॅट कमिन्सने सुरुवातीला विकेट घेत आशा निर्माण केल्या होत्या. पण त्यानंतर हैदराबादला केकेआरचे फलंदाज बाद करता आले नाहीत. पॅट कमिन्सशिवाय शहबाज अहमदने एक विकेट घेतली.
advertisement
आयपीएलच्या १७ व्या हंगामात सनरायजर्स हैदराबादची सर्वात मोठी ताकद फलंदाजी होती. पण फायनलमध्ये पॅट कमिन्सची मोठी चूक झाली. त्याला खेळपट्टीचा अंदाज आला नाही आणि संघाला फक्त ११३ धावाच करता आल्या. या सामन्यात केकेआरने एकतर्फी विजय मिळवून तिसऱ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
अख्ख्या हंगामात धडकी भरवणारे फायनलला धाडकन् आपटले, कमिन्सची एक चूक महागात; SRHचा डाव कुठे गंडला?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement