स्वप्न उराशी धरून रांचीवरून मुंबईत आला, कुर्ली स्टेशनवर सुरू झाला संघर्ष, 8 वर्षानंतर करतो रणजी संघात डेब्यू! पाहा कोण?

Last Updated:

Irfan Umair Mumbai Cricketer : माझ्यासाठी मुंबई गाठणं समस्या नव्हती, पण मुंबईत जगणं मोठं आव्हान होतं, असं इरफान उमैर म्हणतो. मुंबईत आल्यावर त्याला एक रुम मिळाली. त्या रुममध्ये 12 पोरं राहत होती.

Irfan Umair Mumbai Cricketer
Irfan Umair Mumbai Cricketer
Irfan Umair Mumbai Ranji Debut : टीम इंडियासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न देशातील गल्लोगल्लीत तयार होतं. गल्लीतल्या बारक्या पोराला पण मोठं होईल सचिन किंवा विराट व्हावं वाटतं. पोरगं या नादात अगदी विराट सारखं बॅट देखील फिरवतं. पण प्रत्येकाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचता येत नाही, मोठ्या टप्प्यापर्यंत पोहोचायला गरज लागते मेहनतीची आणि प्रबळ इच्छाक्तीची... अशाच एका खेळाडूचा प्रवास सुरू झाला तो मुंबईच्या कुर्ला स्टेशनवर अन् आज त्याची मेहनत कामाला आली. उराशी क्रिकेटर व्हायचं स्वप्न बाळगून एक मुलगा रांचीवरून 2017 ला मुंबईत आला. त्याच्या संघर्षाची स्टोरी...

मुंबईत जगणं मोठं आव्हान

रांचीमध्ये राहणारा इरफान उमैर रांचीवरून 2017 मध्ये मुंबईत आला. मुंबईच्या कुर्ला स्टेशनवर उतरला अन् आयुष्याचा नवा प्रवास सुरू झाला. कुठं रहायचं? हा सर्वात मोठा प्रश्न त्याच्या समोर होता. माझ्यासाठी मुंबई गाठणं समस्या नव्हती, पण मुंबईत जगणं मोठं आव्हान होतं, असं इरफान उमैर म्हणतो. मुंबईत आल्यावर त्याला एक रुम मिळाली. त्या रुममध्ये 12 पोरं राहत होती. खिशात पैसे नसल्याने काही दिवस स्टेशनवर झोपावं लागलं. मी 5500 रुपये घेऊन आलो होतो आणि लवकरच संपले. माझ्या एका मित्राने, ज्याच्यासोबत मी खोली शेअर केली होती, मला सल्ला दिला की मी केटरिंगचे काम करू शकतो, असं इरफान म्हणाला.
advertisement

स्थानिक प्रशिक्षक प्रशांत शेट्टी यांना भेटला अन्...

इरफानचे वडील सौदी अरेबियामध्ये काम करत होते. तर आई भारतात घरकाम करायची. क्रिकेट खेळण्यासाठी दोघांचा विरोध होता. पण उमैर काकांकडे गेला अन् त्यांची समजूत घातली. पालकांना तो क्रिकेट खेळू इच्छित होता याबद्दल फारसा आनंद झाला नाही. मुंबईत आल्यावर इरफान स्थानिक प्रशिक्षक प्रशांत शेट्टी यांना भेटला. प्रशांत यांनी त्याला शिवाजी पार्कवर गोलंदाजी करताना पाहिलं आणि वांद्रे पूर्वेतील एका प्रसिद्ध क्लब एमआयजीला कळवलं.
advertisement

तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस

मैदानाबाहेरील परिस्थिती वेगळी होती. वेटरचे काम करण्याचा इरफानचा पहिला दिवस खूप वाईट गेला. त्याने भरल्या आवाजात सांगितलं, "तुम्ही कधी वेटर म्हणून काम केलं आहे का? माझ्या एका हातात स्टार्टर असलेला कॉस्ट्यूम मला देण्यात आला होता. तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता, असं इरफान म्हणतो. मी रूमवर परतल्यावर रडलो. मी स्वतःला विचारले, 'तू इथे कशासाठी आला आहेस आणि तू काय करत आहेस?' मी कुटुंबाला सांगितलं नाही, पण पोट भरण्यासाठी ते काम करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, असंही इरफान म्हणाला.
advertisement

शार्दुल ठाकूरने केलं इरफानचं कौतूक

कोव्हिडमध्ये लपूनछपून दिवस काढले. पैसे कमवण्याठी टेबल टेनिस खेळून पैसे काढले. पण नशिबाने त्याची पुन्हा परीक्षा घेतली. रमालकाने त्याला त्याची खोली रिकामी करण्यास सांगितलं अन् त्याची मुंबईच्या वरिष्ठ संघात समावेश होण्याची संधी हुकली. मुंबईत अनेक संघर्ष केल्यानंतर आता तो रणजी संघात डेब्यू करणार आहे. मुंबईचा रणजी कर्णधार शार्दुल ठाकूर याने देखील इरफानचं कौतूक केलंय. अशातच आता त्याचा इथून टीम इंडियापर्यंतचा प्रवास कसा असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
स्वप्न उराशी धरून रांचीवरून मुंबईत आला, कुर्ली स्टेशनवर सुरू झाला संघर्ष, 8 वर्षानंतर करतो रणजी संघात डेब्यू! पाहा कोण?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement