Virat Kohli : '...त्याने सोपा मार्ग निवडला', विराटच्या 8 महिन्यांपूर्वीच्या निर्णयावर भडकले संजय मांजरेकर
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विराट कोहलीच्या पिढीमधले जो रूट, केन विलियमसन आणि स्टीव्ह स्मिथ आजही सक्रिय आहेत आणि उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधली निवृत्ती अजूनही न पचवता येणारी आहे. विराटच्याच पिढीमधले जो रूट, केन विलियमसन आणि स्टीव्ह स्मिथ आजही सक्रिय आहेत आणि उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ऍशेस सीरिजच्या पाचव्या टेस्टमध्ये जो रूटने त्याचं 41 वे तर स्टीव्ह स्मिथने 37वे शतक पूर्ण केलं. यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेट सोडण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विराटने सगळ्यात सोप्या अशा वनडे फॉरमॅटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतल्याचं मांजरेकर म्हणाले.
मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'जेव्हा जो रूट टेस्ट क्रिकेटमध्ये नवी उंची गाठत होता, तेव्हा माझं लक्ष विराट कोहलीकडे जातं. त्याने टेस्ट क्रिकेट सोडून दिलं. निवृत्तीआधी 5 वर्ष विराट टेस्टमध्ये संघर्ष करत होता. टेस्ट क्रिकेटमध्ये या काळात आपली सरासरी 31 एवढी कमी का राहिली? हे जाणून घ्यायचा प्रयत्न विराटने केला नाही', असं मांजरेकर म्हणाले.
advertisement
advertisement
'विराट आणखी चांगलं करू शकला असता का? याची चर्चा नंतर होऊ शकते. पण जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियमसन यांच्यासारखे खेळाडू त्यांची वेगळी ओळख तयार करत आहेत, पण विराटने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली, याचं दु:ख आहे. विराटने तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असती, तर मला काहीही आक्षेप नसता, पण त्याच्या टेस्ट सोडून वनडे खेळण्याच्या निर्णयामुळे मी जास्त निराश आहे. कारण वनडे फॉरमॅट सर्वोत्तम खेळाडूसाठी सगळ्यात सोपा फॉरमॅट आहे', असं वक्तव्य संजय मांजरेकर यांनी केलं आहे.
advertisement
वनडे सोपं म्हणून खेळतोय विराट
'बाकीचे तीन खेळाडू टेस्ट क्रिकेटमध्ये रन करत असताना विराट या फॉरमॅटचा भाग नाही. हा त्याचा निर्णय आहे, ही त्याची पसंत आहे, पण जो रूट जेव्हा शतक करतो किंवा रन करतो, स्टीव्ह स्मिथ, केन विलियमसन रन करतो, तेव्हा माझ्या मनात विराटचा विचार होतो आणि मी निराश होतो, कारण विराट टेस्ट क्रिकेटवर इतकं प्रेम करतो', असं संजय मांजरेकर म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 8:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : '...त्याने सोपा मार्ग निवडला', विराटच्या 8 महिन्यांपूर्वीच्या निर्णयावर भडकले संजय मांजरेकर











