SRH VS KKR : गंभीरचा 'खंबीर' आधार! केकेआरचं तिसऱ्यांदा विजेतेपद, तिन्ही वेळा निभावली महत्त्वाची भूमिका

Last Updated:

सनरायजर्स हैदराबादवर मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर केकेआरच्या खेळाडूंनी गंभीरला खांद्यावर उचलून घेतले.

गौतम गंभीर
गौतम गंभीर
मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या फायनल सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवून तिसऱ्यांदा आयपीएलची चॅम्पियनशिप मिळवली. केकेआरचा मेंटॉर गौतम गंभीर या केकेआरच्या या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. सनरायजर्स हैदराबादवर मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर केकेआरच्या खेळाडूंनी गंभीरला खांद्यावर उचलून घेतले.
चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात फायनल सामना खेळवण्यात आला. या सामन्याच्या सुरुवातीला सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तर केकेआरला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले होते. यावेळी हैदराबादच्या टीमने फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 10 विकेट्स गमावून केवळ 113 धावा केल्या ज्यामुळे केकेआरला विजयासाठी 114 धावांचं सोपं आव्हान मिळालं.
advertisement
विजयासाठी मिळालेलं टार्गेट कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी अवघ्या 11 ओव्हर्समध्ये पूर्ण केले. केकेआरने 8 विकेट्स राखून हैदराबादवर विजय मिळवला आणि आयपीएल 2024 ची चॅम्पियन टीम ठरली. केकेआरने मिळवलेल्या या यशात त्यांचा मेंटॉर गौतम गंभीर याचा मोठा वाटा आहे. यापूर्वी 2012 आणि 2014 रोजी गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असताना टीमने चॅम्पियनशिप मिळवली होती. तर आता गंभीर मेंटॉर असताना टीमने तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे.
advertisement
advertisement
advertisement
गौतम गंभीरने यंदा केकेआरची मेंटॉरशीप करताना ऑक्शनच्या टेबलवर योग्य खेळाडूंना संघात घेण्यापासून ते मैदानात टीमला मार्गदर्शन करण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींमध्ये महत्वाची भूमिका बजावली. आयपीएल 2024 पूर्वी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये गौतम गंभीरने ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कवर तब्बल 24.75 कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतले. सुरुवातीला मिचेल स्टार्क अनेक सामन्यांमध्ये एकही विकेट घेऊ शकला नव्हता मात्र जस जशी स्पर्धा पुढे गेली तस तसा स्टार्कचा फॉर्मात येऊ लागला. फायनल सामन्यात सुद्धा स्टार्कने तब्बल 2 विकेट्स घेतल्या. अशा प्रकरणे स्टार्कला आपल्या संघात घेण्याचा गंभीरचा निर्णय अतिशय योग्य ठरला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH VS KKR : गंभीरचा 'खंबीर' आधार! केकेआरचं तिसऱ्यांदा विजेतेपद, तिन्ही वेळा निभावली महत्त्वाची भूमिका
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement