Team India : T20 वर्ल्ड कपआधी शेवटचं चॅलेंज, भारत-न्यूझीलंड सीरिज कधी सुरू होणार? पाहा शेड्यूल

Last Updated:

भारतीय क्रिकेट टीम आता थेट पुढच्या वर्षीच मैदानात उतरणार आहे. जानेवारी महिन्यात न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधीची भारताची ही शेवटची सीरिज असेल.

T20 वर्ल्ड कपआधी शेवटचं चॅलेंज, भारत-न्यूझीलंड सीरिज कधी सुरू होणार? पाहा शेड्यूल
T20 वर्ल्ड कपआधी शेवटचं चॅलेंज, भारत-न्यूझीलंड सीरिज कधी सुरू होणार? पाहा शेड्यूल
मुंबई : टीम इंडियासाठी 2025 हे वर्ष चांगलं गेलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने आशिया कपमध्ये विजय मिळवला. वर्षाच्या शेवटच्या टी20 सीरिजमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 3-1 ने पराभव केला. आता भारतीय क्रिकेटचे चाहते पुढच्या सीरिजची वाट पाहत आहेत.
भारतीय क्रिकेट टीम आता थेट पुढच्या वर्षीच मैदानात उतरणार आहे. जानेवारी महिन्यात न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरूवात 3 वनडे मॅचच्या सीरिजने होईल. त्यानंतर दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज होईल. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधीची भारताची ही शेवटची सीरिज असेल. 2026 चा टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, तर न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज 31 जानेवारीला संपणार आहे.
advertisement

आधी वनडे सीरिज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरूवातीला वनडे सीरिज खेळवली जाईल. तीन सामन्यांची ही सीरिज 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. सीरिजचा शेवटचा सामना 18 जानेवारीला खेळवला जाईल. वनडे सीरिजनंतर दोन्ही टीममध्ये टी-20 सीरिज होईल. टी-20 सीरिजला 21 जानेवारीला सुरूवात होईल.

भारत-न्यूझीलंड वनडे सीरिज

11 जानेवारी - पहिला वनडे : बडोदा (दुपारी 1:30)
advertisement
14 जानेवारी - दुसरी वनडे : राजकोट (दुपारी 1:30)
18 जानेवारी - तिसरा वनडे : इंदूर (दुपारी 1:30)
भारत-न्यूझीलंड टी-20 सीरिज
21 जानेवारी - पहिला T20: नागपूर (संध्याकाळी 7)
23 जानेवारी - दुसरी T20: रायपूर (संध्याकाळी 7)
25 जानेवारी - तिसरा T20: गुवाहाटी (संध्याकाळी 7)
28 जानेवारी - चौथी T20 : विशाखापट्टणम (संध्याकाळी 7)
advertisement
31 जानेवारी - पाचवी T20: तिरुवनंतपुरम (संध्याकाळी 7)
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : T20 वर्ल्ड कपआधी शेवटचं चॅलेंज, भारत-न्यूझीलंड सीरिज कधी सुरू होणार? पाहा शेड्यूल
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement