Marriage Muhurth 2026: विवाह होतील, पण 'शुभ' विवाह होणं अवघड; यंदा लग्नाळूंच्या आडवी अनेक विघ्नं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Marriage Muhurth: नवीन 2026 सालात वेगळीच अडचण लग्नाचे बाशिंग बांधून तयार असलेल्यांसमोर असणार आहे. पंचांगानुसार, विविध कारणांनी लग्नासाठी शुभ मुहूर्त मिळणं कठीण होणार आहे. म्हणजेच लग्नासाठी आवश्यक शुभ विवाह मुहूर्त..
मुंबई : लग्न जुळवून लग्न विधी पार पाडणं आजकाल मोठं अवघड काम झालं आहे. लग्न जुळवण्यात अनेकांची वये निघून चालली आहेतच, शिवाय यंदा म्हणजे नवीन 2026 सालात वेगळीच अडचण लग्नाचे बाशिंग बांधून तयार असलेल्यांसमोर असणार आहे. पंचांगानुसार, विविध कारणांनी लग्नासाठी शुभ मुहूर्त मिळणं कठीण होणार आहे. म्हणजेच लग्नासाठी आवश्यक शुभ विवाह मुहूर्त फारच कमी मिळत आहेत. त्यामुळे अनेकांना गौण मुहूर्तांवरच विवाह विधी आटोपून घ्यावे लागण्याची वेळ येईल, असं चित्र आहे.
पंचागानुसार, विवाह इच्छुकांसाठी हे वर्ष बरेच कठीण असेल, कारण या वर्षात अधिक मास, गुरु, शुक्र ग्रहांचा अस्त, चातुर्मास आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे शुद्ध विवाह मुहूर्त फार कमी आहेत. जानेवारी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तब्बल सहा महिन्यांमध्ये शुभविवाहाचा एकही मुहूर्त नाही. त्यामुळे गौण मुहूर्तावर विवाह करण्याची वेळ इच्छुकांवर येणार आहे.
advertisement
सध्याच्या घडीला विवाह बंधनात अडकण्यासाठी तब्बल दोन महिने वाट पाहावी लागली आहे. पंचांगानुसार 14 डिसेंबर 2025 ते 29 जानेवारी 2016 या कालावधीत शुक्र ग्रह अस्त स्थितीमध्ये असणार आहे. शुक्रास्त असल्याने शुभविवाह होणे शक्य नाही. त्यामुळे शुभ विवाह मुहूर्तावर लग्न करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना इतका कालावधी थांबणे शक्य नाही त्यांनी गौण मुहूर्तावर पंचांग तज्ज्ञांकडून माहिती घेऊन लग्न करता येईल.
advertisement
गौण काळातील मुहूर्त -
डिसेंबर महिन्यात आता फक्त 25 तारखेला सकाळी अकरा वाजून 49 मिनिटांनी एकच गौण काळातील विवाह मुहूर्त शिल्लक आहे. तर जानेवारी महिन्यात 20 जानेवारी दुपारी 12 वाजून 49 मिनिटे ते सायंकाळी 06 वाजून 17 मिनिटे, 23 जानेवारी 24 जानेवारी 25 जानेवारी 26 जानेवारी 28 जानेवारी 29 जानेवारी या दिवशी मुहूर्त आहेत.
advertisement
वर्ष 2016 मधील शुभविवाह तारखा -
फेब्रुवारी - दिनांक 3 5 6 7 8 10 11 12 20 22 25 26
मार्च - 5 7 8 12 14 15 16
एप्रिल - 21 26 28 29 30
मे - 1 3 6 7 8 9 10 13 14
जून - 19 20 23 24 27
advertisement
जुलै - 1 2 3 4 7 8 9 11
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 10:31 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Marriage Muhurth 2026: विवाह होतील, पण 'शुभ' विवाह होणं अवघड; यंदा लग्नाळूंच्या आडवी अनेक विघ्नं










