New Year Party : पार्टीचा प्लॅन करताय? पण घरात किती दारू साठवून ठेवता येते? नवीन वर्षात जेलची हवा खायची नसेल 'हे' नियम लक्षात ठेवा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
घरात किती दारू साठवून ठेवणे कायदेशीर आहे? जर तुमच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त साठा आढळला, तर नवीन वर्षाचे स्वागत घराऐवजी जेलमध्ये करावे लागू शकते.
वर्ष 2025 ला निरोप देण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. ख्रिसमस आणि त्यानंतर येणारे नवीन वर्ष... हा काळ म्हणजे जल्लोषाचा, पार्ट्यांचा आणि आनंदाचा. याकाळात काही लोक बाहेर फिरायला जातात. तर काही लोक हॉटेलमध्ये जातात. तर काही हाऊस पार्टीचा आनंद घेतात. अनेकदा अशा काळात हॉटेल्समध्ये खूप गर्दी असते आणि इतर कुठे रहाण्याचा प्लान करायचं म्हटलं की सगळ्याच गोष्टींची किंमत वाढलेली असते, त्यामुळे लोक हाउस पार्टीचाच विचार करतात. अशा पार्ट्यांमध्ये मद्यपानाचे बेतही आखले जातात. पण, उत्साहाच्या भरात आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे 'कायदा'.
advertisement
advertisement
advertisement
'या' राज्यांमध्ये आहे पूर्ण बंदी (Dry States)जर तुम्ही बिहार, गुजरात, नागालँड, मिझोराम किंवा लक्षद्वीपमध्ये राहत असाल, तर इथे दारू पिणे किंवा बाळगणे हा गंभीर गुन्हा आहे. बिहारमध्ये 2016 पासून तर गुजरातमध्ये 1960 पासून पूर्ण दारूबंदी आहे.लक्षद्वीपमध्ये केवळ बंगाराम बेटावर पर्यटकांना सवलत आहे, स्थानिकांना मात्र बंदी आहे.
advertisement
तुमच्या राज्यात किती बाटल्या ठेवण्याची परवानगी? (State-wise Guide)दिल्ली : 18 लिटर (बीयर/वाईन) किंवा 9 लिटर हार्ड लिकर (व्हिस्की, रम इ.). वय 25+ असणे गरजेचे.महाराष्ट्र :साठवणुकीसाठी परमिट आवश्यक. पिण्यासाठी वय (बीयर 21, हार्ड लिकर 25).उत्तर प्रदेश : 1.5 लिटर विदेशी दारू, 6 लिटर बीयर, 2 लिटर वाइन. यापेक्षा जास्त साठ्यासाठी L-50 लायसन्स हवे.हरियाणा : 18 बाटल्या IMFL (त्यातील 6 पेक्षा जास्त इम्पोर्टेड नसाव्यात), 12 बाटल्या बीयर.मध्य प्रदेश : वार्षिक शुल्क भरून एखादी व्यक्ती चक्क 100 बाटल्या घरात ठेवू शकते.गोवा : 12 बाटल्या IMFL, 24 बाटल्या बीयर, 18 बाटल्या देशी दारू.पंजाब : 2 बाटल्या IMFL, 650 मिलीच्या 12 बीयर बाटल्या, 2 बाटल्या देशी दारू.पश्चिम बंगाल : 750 मिलीच्या 6 बाटल्या (IMFL) आणि 18 बाटल्या बीयर.
advertisement
मद्यपानासाठी कायदेशीर वय काय?भारतात दारू पिण्याचे वय देखील राज्यानुसार बदलते. अनेकदा कमी वयातील मुले पार्टीत मद्यपान करतात, जे कायदेशीररीत्या गुन्हा आहे:18 वर्षे: गोवा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, सिक्कीम.21 वर्षे: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश.23 वर्षे: केरळ.25 वर्षे: दिल्ली, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र (हार्ड लिकरसाठी).
advertisement
पार्टी करण्यापूर्वी हे लक्षात घ्याएका राज्यातून दुसऱ्या राज्यात दारू नेणे जोखमीचे ठरू शकते. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशात तुम्ही बाहेरून केवळ १ लिटरची सीलबंद बाटलीच आणू शकता. जर तुम्हाला घरात बार बनवायचा असेल किंवा मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवायची असेल, तर अबकारी विभागाकडून (Excise Department) विशेष लायसन्स घेणे अनिवार्य आहे.ओळखपत्र: नवीन वर्षाच्या पार्टीत जर तुम्ही घराबाहेर मद्यपान करणार असाल, तर वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा ओळखपत्र सोबत ठेवा.
advertisement
advertisement









