Asia Cup Final : रविवारी भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार, किती वाजता सुरू होणार आशिया कप फायनल, कुठे पाहाल?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अंडर-19 आशिया कप 2025 (50 ओव्हर फॉरमॅट) ची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. याआधी 3 महिन्यांपूर्वी दोन्ही देशांच्या सीनियर टीम एकमेकांविरुद्ध आशिया कपची फायनल खेळल्या होत्या.
मुंबई : अंडर-19 आशिया कप 2025 (50 ओव्हर फॉरमॅट) ची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. याआधी 3 महिन्यांपूर्वी दोन्ही देशांच्या सीनियर टीम एकमेकांविरुद्ध आशिया कपची फायनल खेळल्या होत्या. आता अंडर-19 आशिया कपमध्ये आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरेल, याआधी सेमी फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा तर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून फायनल गाठली होती.
भारतीय क्रिकेट टीम 8 वेळा अंडर-19 आशिया कपची ट्रॉफी जिंकली होती, पण 2024 साली झालेल्या मागच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये बांगलादेशकडून भारताचा पराभव झाला होता. दुसरीकडे पाकिस्तानची टीम 2017 नंतर पहिल्यांदाच अंडर-19 आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंडर-19 आशिया कपची फायनल याआधी 2014 साली झाली होती, या सामन्यात भारताचा 40 रननी विजय झाला होता.
advertisement
कधी होणार भारत-पाकिस्तान फायनल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंडर-19 आशिया कपची फायनल मॅच रविवार 21 डिसेंबरला होणार आहे. हा सामना दुबईच्या आयसीसी अकॅडमी ग्राऊंडवर खेळला जाईल.
किती वाजता सुरू होणार सामना?
अंडर-19 आशिया कपची फायनल भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल, तर टॉस सकाळी 10 वाजता होईल.
भारतीय अंडर-19 टीम
advertisement
आयुष म्हात्रे (कर्णधार), राहुल कुमार, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, युवराज गोहिल, आरोन जॉर्ज, बी.के.किशोर, जगनाथन, कनिष्क चौहान, खिलन पटेल, अभिज्ञान अभिषेक (विकेट कीपर), हरवंश पंगालिया (विकेट कीपर), आदित्य रावत, दीपेश देवेंद्रन, हेनिल पटेल, किशन कुमार सिंग, नमन पुष्पक, उद्धव मनीष मोहन
पाकिस्तानची अंडर-19 टीम
हसन बलोच, फरहान युसूफ (कर्णधार), हुजैफा अहसान, समीर मिन्हास, उस्मान खान, अब्दुल कादिर, अब्दुल सुभान, अहमद हुसैन, मोहम्मद हसन खान, उमर जैब, हमजा जहूर, मोहम्मद शायन, अली रझा, डॅनियल अली खान, हसैन डार, इब्तिसाम अजहर, मोहम्मद हुजैफा, मोहम्मद सायम, मोमिन करम, निकाब शफीक
advertisement
कुठे पाहता येणार सामना?
अंडर-19 आशिया कप 2025 च्या फायनलचं लाईव्ह प्रसराण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर होईल. टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स 1 चॅनलवर लाईव्ह मॅच पाहता येईल, तर मोबाईल आणि लॅपटॉपवर सोनी लिव्ह ऍप किंवा वेबसाईटवर मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 9:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup Final : रविवारी भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार, किती वाजता सुरू होणार आशिया कप फायनल, कुठे पाहाल?









