Sunil Gavaskar Statue : बॅटींग पाहण्यासाठी आई झाडामागे लपून...सुनील गावस्करांनी सांगितला कुणाला माहित नसलेला भावनिक क्षण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताचा महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर आणखी एका मोठ्या कामगिरीची नोंद झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) शरद पवार क्रिकेट संग्रहालयाबाहेर त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
Sunil Gavaskar News : भारताचा महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर आणखी एका मोठ्या कामगिरीची नोंद झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) शरद पवार क्रिकेट संग्रहालयाबाहेर त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.या प्रसंगी बोलताना गावस्कर यांनी त्यांच्या आयुष्यातला सर्वात खास क्षण सांगितला. बाबा ऑफिसला जायचे म्हणून माझी आई मला मैदानावर सोडायची.तेव्हा ती घरी जायची किंवा झाडामागे लपून मॅच बघायची,अशी गावस्कर यांनी आठवण सांगितली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयाबाहेर सुनील गावस्कर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक उपस्थित होते. हा सन्मान माझ्यासाठी किती मोठा आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. क्रिकेट संग्रहालयाबाहेर पुतळा बसवण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही, जिथे दररोज हजारो लोक येतात. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जितके अभार मानेन तितके कमी आहे, असे गावस्कर म्हणाले आहेत.
advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशन माझ्या आईसारखी आहे. बाबा ऑफिसला जायचे म्हणून माझी आई मला मैदानावर सोडायची.तेव्हा ती घरी जायची किंवा झाडामागे लपून मॅच बघायची.जसं तिने मला मैदानावर आणलं तसं मुंबई क्रिकेट असोसिएशनने माझा मैदानाबाहेर हात पकडला, असे त्यांनी सांगितले.
अनेकवेळा तुम्ही धावा करता विकेट घेता.त्यामुळे तुम्हाला एक मदत लागते, प्रोत्साहन हवं असतं ते मिळत नाही. पण मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला ते नेहमीच दिलं,असे गावस्कर यांनी आवर्जुन सांगितलं. मी मुंबईसाठी पहिली मॅच इराणी ट्रॉफी खेळली होती.त्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी भारतीय संघाची निवड होणार होती. त्या मॅचचा 22 खेळाडूपैकी 21 खेळाडू भारतीय संघात निवड होण्यासाठी खेळत होते. आणि मी एकटाच असा खेळाडू होतो, जो फक्त मुंबईत संघात स्थान मिळवण्यासाठी खेळत होतो,असे गावस्कर यांनी सांगितले.
advertisement
क्रिकेटमध्ये कधीच कुणी मास्टर नसतं, तुम्ही कितीही कोणाला मास्टर म्हणा. लिटल मास्टर म्हणा. जोपर्यंत तुम्ही क्रिकेटचे विद्यार्थी असाल तिथपर्यंत तुम्ही क्रिकेट आणखीण एंन्जॉय करू शकाल. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला शिकायला मिळते.त्यामुळे शिकत राहणे महत्वाचे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 24, 2025 6:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sunil Gavaskar Statue : बॅटींग पाहण्यासाठी आई झाडामागे लपून...सुनील गावस्करांनी सांगितला कुणाला माहित नसलेला भावनिक क्षण









