Saurabh Netravalkar : बालपणी उराशी स्वप्न बाळगलं, 19 दिवसानंतर पूर्ण होणार! विराटला भिडणारा सौरभ नेत्रावळकर का झाला भावुक?

Last Updated:

Saurabh Netravalkar in T20 World Cup against india : सौरभने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मुंबईतून केली होती आणि 2010 मध्ये भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप संघात तो सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर होता.

Saurabh Netravalkar in T20 World Cup against india
Saurabh Netravalkar in T20 World Cup against india
Saurabh Netravalkar represents USA In India : ज्या मातीत क्रिकेटचे पहिले धडे गिरवले, ज्या मैदानावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्वप्न पाहिले, त्याच वानखेडे स्टेडियमवर तब्बल अनेक वर्षांनंतर परतणे, ही सौरभ नेत्रावळकरसाठी केवळ एक 'मॅच' नसून त्याच्या आयुष्याचे 'पूर्ण वर्तुळ' आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अमेरिकन क्रिकेट संघात खळबळ माजवणारा भारतीय वंशाचा वेगवान बॉलर सौरभ नेत्रावळकर सध्या आपल्या जबरदस्त कामगिरीमुळे जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मूळचा मुंबईचा असलेला हा खेळाडू आता भारतात भारताविरुद्ध खेळणार आहे.
सौरभ नेत्रावळकर म्हणतो, "हा माझ्यासाठी अत्यंत हळवा क्षण आहे. मी मुंबईतच क्रिकेटला सुरुवात केली आणि तिथेच ते सोडलंही होतं. अमेरिकेला गेल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी पुन्हा येईन, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आज नियतीने मला पुन्हा माझ्या घरी, माझ्या माणसांसमोर आणून उभं केलं आहे." सौरभने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मुंबईतून केली होती आणि 2010 मध्ये भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप संघात तो सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर होता.
advertisement
आपल्या कुटुंबासमोर आणि जिवलग मित्रांसमोर वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळणं, हे सौरभचे बालपणीचे स्वप्न होतं. 7 फेब्रुवारीचा तो दिवस त्याच्यासाठी केवळ एक तारीख नसून, त्याच्या कष्टांचे आणि संयमाचे फळ असेल, असं सौरभ म्हणतो. कोडिंग आणि क्रिकेट या दोन टोकांच्या जगात ताळमेळ बसवत सौरभने दाखवून दिलं की, जर मनात जिद्द असेल तर विखुरलेली स्वप्ने पुन्हा नक्कीच सावरता येतात.
advertisement
मुंबईचा मुलगा आता वानखेडेवर खेळणार आहे. 2013 मध्ये याच मुंबईसाठी सौरभने सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर यांसारख्या खेळाडूंसोबत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. क्रिकेटची आवड बाजूला सारून तो 2015 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. कॉर्नेल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि सध्या तो 'ओरेकल'मध्ये कोडिंगची नोकरी करत आहे.
दरम्यान, कॉर्पोरेट जगातील धावपळ आणि कोडिंगची जॉब सांभाळत त्याने क्रिकेटची आपली ओढ जिवंत ठेवली. आज तो अमेरिकन संघाचा स्टार वेगवान गोलंदाज म्हणून भारतासमोर उभा ठाकणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Saurabh Netravalkar : बालपणी उराशी स्वप्न बाळगलं, 19 दिवसानंतर पूर्ण होणार! विराटला भिडणारा सौरभ नेत्रावळकर का झाला भावुक?
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement