Asian Games : फक्त 9 चेंडूत अर्धशतक, युवराजचा विश्वविक्रम नेपाळच्या फलंदाजाने मोडला
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
दीपेंद्रने युवराजचा 16 वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला. दिपेंद्रने टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावलं.
हांगझोऊ, 27 सप्टेंबर : एशियन गेम्समध्ये नेपाळच्या संघाने मंगोलियाविरुद्ध खेळताना विश्वविक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांनी नेपाळने विजय मिळवला. मंगोलियाला 273 धावांनी हरवलं. या सामन्यात नेपाळच्या फलंदाजांनी मंगोलियाच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. कुशल मल्लाने टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक केलं तर दिपेंद्र सिंह ऐरीने सर्वात वेगवान अर्धशतक केलं. कुशल मल्लाने रोहित शर्मा, डेव्हिड मिलर आणि सुदेश विक्रमशेखर यांचा विश्वविक्रम मोडला.
दीपेंद्रने युवराजचा 16 वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला. दिपेंद्रने टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावलं. 10 चेंडूत नाबाद 52 धावा त्याने केल्या. त्याने फक्त 9 चेंडूतच अर्धशतक केलं. दिपेंदने 10 पैकी 8 चेंडूवर षटकार मारले. तर कुशल मल्लाने 50 चेंडूत 137 धावा करताना 8 चौकार आणि 12 षटकार मारले. याशिवाय रोहित पौडेल यानेही फटकेबाजी केली. 27 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्यामदतीने त्याने 61 धावा केल्या.
advertisement
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता. त्याने 2007च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. त्याच सामन्यात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या 6 चेंडूत 6 षटकार मारले होते.
सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 314 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मंगोलियाच्या संघाला 41 धावाच करता आल्या. नेपाळकडून करन केसी, अविनाश बोहरा आणि संदिप लामिछने यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. एशियन गेम्समध्ये नेपाळ, मंगोलिया आणि मालदिव ग्रुप ए मध्ये आहेत. कंबोडिया, हाँगकाँग, जपान बी ग्रुपमध्ये, तर मलेशिया, सिंगापूर, थायलंड ग्रुप सीमध्ये आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2023 11:31 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games : फक्त 9 चेंडूत अर्धशतक, युवराजचा विश्वविक्रम नेपाळच्या फलंदाजाने मोडला