T20 World Cup ला फक्त 25 दिवस शिल्लक असताना स्कॉडची घोषणा, 18 फेब्रुवारीला टीम इंडियाला भिडणार!

Last Updated:

Netherlands T20 World Cup 2026 squad : निवड समितीने या संघात मोठे बदल केले असून अनेक अनुभवी खेळाडूंना पुन्हा एकदा संधी दिली आहे. अनुभवी खेळाडूंची संघात 'घरवापसी' झाल्याचं पहायला मिळतंय.

Netherlands T20 World Cup 2026 squad
Netherlands T20 World Cup 2026 squad
ICC Mens T20 World Cup 2026 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्डसाठी आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच पुढच्या महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी नेदरलँड्सने आपला संघ जाहीर केला आहे. निवड समितीने या संघात मोठे बदल केले असून अनेक अनुभवी खेळाडूंना पुन्हा एकदा संधी दिली आहे. अनुभवी खेळाडूंची संघात 'घरवापसी' झाल्याचं पहायला मिळतंय.

रोल्फ वान डर मर्वे याचे संघात पुनरागमन

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या मालिकेच्या तुलनेत या संघात बरेच बदल दिसतायत. दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करून आता नेदरलँड्सकडून खेळणाऱ्या रोल्फ वान डर मर्वे याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्यासोबतच बास डी लीड, मिचेल लेविट आणि जाक लॉयन सैशे यांनाही परत बोलावण्यात आले आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by ICC (@icc)



advertisement

कॅप्टन पुन्हा स्कॉट एडवर्ड्स

कोलिन एकरमैन हा नोव्हेंबर 2024 नंतर तो पहिला टी-20 सामना खेळणार आहे. विटालिटी ब्लास्ट-2025 मध्ये त्याने 304 धावा कुटल्या होत्या. टिम वान डर गुगटेन हा 34 वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज विटालिटी ब्लास्टमध्ये चमकदार कामगिरी करत संघात स्थान मिळवले आहे. जुलै 2024 पासून संघाबाहेर असलेल्या लोगन वान बीकचेही संघात पुनरागमन झाले आहे. संघाची धुरा पुन्हा एकदा अनुभवी स्कॉट एडवर्ड्स याच्या खांद्यावर असेल. नेदरलँड्सचा संघ मोठ्या स्पर्धांमध्ये धक्कादायक निकाल देण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे त्यांना हलक्यात घेणे कोणत्याही संघाला महागात पडू शकते.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपसाठी नेदरलँड्सचा संघ - स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), नोह क्रोस, मॅक्स ओ दाऊद, साकिब जुल्फीकार, आर्यन दत्त, काइल क्लेन, पॉल वान मीकेरेन, फ्रेड क्लासेन, कोलिन एकरमैन, बास डे लीड, मिचेल लेविट, जाक लियान सैसे, लोगान वान बीक, रोल्फ वान डर मर्वे, टिम वान डर गुगटेन.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup ला फक्त 25 दिवस शिल्लक असताना स्कॉडची घोषणा, 18 फेब्रुवारीला टीम इंडियाला भिडणार!
Next Article
advertisement
Wilson Gymkhana: गिरगावकरांच्या हक्काच्या जागेवर आता कुंपण! विल्सन जिमखाना आता 'जैन जिमखाना, स्थानिकात संतापाची लाट
गिरगावकरांच्या हक्काच्या जागेवर आता कुंपण! विल्सन जिमखाना आता 'जैन जिमखाना, स्था
  • मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि परप्रांतीयांचा वाढणारा टक्का आदी मुद्देही चर्चेत

  • मराठी-अमराठी वादाची उजळणी सुरू असताना दुसरीकडे या वादाची तीव्रता वाढवणारी घटना स

  • विल्सन मैदानाचा ताबा आल्यानंतर त्याचे नावच जैन जिमखाना

View All
advertisement