NZ vs WI : 6,6,6,6,6,6...18 सिक्स मारले, तरीही वेस्ट इंडिज पराभूत, एका षटकाराने घात केला

Last Updated:

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी तब्बल एका दोन नव्हे तर 18 षटकार लगावले होते. या इतक्या षटकारानंतरही शेवटच्या क्षणी त्यांना विजयासाठी एका षटकाराची आवश्यकता होती. पण तो एक षटकार मारता न आल्याने वेस्ट इंडिजचा पराभव झाला आहे.

new zealand defeat west indies
new zealand defeat west indies
New Zealand Defeat West Indies By 3 Runs : पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत आज दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने 3 धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला. वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 208 धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी तब्बल एका दोन नव्हे तर 18 षटकार लगावले होते. या इतक्या षटकारानंतरही शेवटच्या क्षणी त्यांना विजयासाठी एका षटकाराची आवश्यकता होती. पण तो एक षटकार मारता न आल्याने वेस्ट इंडिजचा पराभव झाला आहे.
advertisement
खंर तर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 207 धावा केल्या होत्या.त्यामुळे न्युझीलंडसमोर 208 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज सुरूवात खराब झाली होती. कारण वेस्ट इंडिजचा सलामीवर ब्रॅडन किंग शुन्यावर बाद झाला होता.त्यानंतर आलिक अॅथनाज आणि शाय होपने वेस्ट इंडिजचा डाव सावरला होता. पण तरी देखील 100 धावांच्या आत वेस्ट इंडिजच्या 6 विकेट पडल्या होत्या.त्यामुळे इथून मॅच जिंकने खूपच अवघड होते. पण तरी देखील वेस्ट इंडिजने आशा सोडली नाही.
advertisement
त्यानंतर रोवमॅन पोवेल आणि रोमारिओ शेफर्डने वेस्ट इंडिजला सावरत सामना रोमांचक आणला होता. या दरम्यान शेफर्ड 34 धावा करून बाद झाला,या खेळीत त्याने 4 षटकार मारला. दरम्यान रोमारीओ पोवेलने अख्खी मॅच विजयाच्या जवळ आणली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता होती. यावेळी मॅथ्यू फोर्डने पहिल्या बॉलवर चौकार मारला.त्यानंतर दुसरा बॉल डॉट ठरला. तिसरा बॉल नो ठरला आणि चौकार गेला. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या बॉलवर 1 धाव आली. अशाप्रकारे 3 बॉलमध्ये 10 धावा आल्या.
advertisement
आता पुढच्या 3 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता होती. त्यावेळेस चांगला लयीत खेळत असलेला रोमारीओ पोवेलने देखील 16 बॉलमध्ये 45 धावा करून बाद झाला. या दरम्यान त्याने 6 षटकार मारले. पाचव्या बॉलवर एक धाव आली.त्यानंतर शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज होती. त्यामुळे वेस्ट इंडिजला सामना ड्रॉ साठी एक चौकार आणि विजयासाठी एक षटकार आवश्यक होता. पण एकच धाव निघाली त्यामुळे 3 धावांनी न्यूझीलंडने सामना जिंकला.
advertisement
खरं तर या सामन्यात वेस्ट इंडिजने 18 षटकार मारले होते. पण जेव्हा त्यांना एका षटकाराची गरज होती, तो षटकारच त्यांना मारता आला नाही आणि त्यांचा पराभव झाला.
दरम्यान न्यूझीलंडकडून चॅपमॅनने 28 बॉलमध्ये 78 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. त्याचसोबत रॉबिन्सनच्या 39 धावांच्या बळावर न्यूझीलंडने 5 विकेट गमावून 207 धावा केल्या.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
NZ vs WI : 6,6,6,6,6,6...18 सिक्स मारले, तरीही वेस्ट इंडिज पराभूत, एका षटकाराने घात केला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement