advertisement

Rohit Sharma : अभिषेक-बुमराह नाही... हे 2 खेळाडू जिंकवून देणार T20 वर्ल्ड कप, रोहित शर्माची मोठी भविष्यवाणी!

Last Updated:

7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. याआधी 2024 साली झालेला टी-20 वर्ल्ड कप भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकला होता, त्यामुळे आता टीम इंडिया वर्ल्ड कपची ट्रॉफी स्वत:कडेच ठेवण्यासाठी उतरेल.

अभिषेक-बुमराह नाही... हे 2 खेळाडू जिंकवून देणार T20 वर्ल्ड कप, रोहित शर्माची मोठी भविष्यवाणी!
अभिषेक-बुमराह नाही... हे 2 खेळाडू जिंकवून देणार T20 वर्ल्ड कप, रोहित शर्माची मोठी भविष्यवाणी!
मुंबई : 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. याआधी 2024 साली झालेला टी-20 वर्ल्ड कप भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकला होता, त्यामुळे आता टीम इंडिया वर्ल्ड कपची ट्रॉफी स्वत:कडेच ठेवण्यासाठी उतरेल. जिओ हॉटस्टारवर बोलताना रोहित शर्माने यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड कोण असेल? याबद्दल भाष्य केलं आहे.
मागच्या वर्ल्ड कपमध्ये बुमराह आणि अर्शदीप हे दोघेही एकत्र असणे आमच्यासाठी सकारात्मक होते, कारण दोघंही विकेट घेणारे बॉलर आहेत. अर्शदीप नवी बॉल स्विंग करतो आणि लवकर विकेट मिळवून देतो. याशिवाय तो डेथ ओव्हर्समध्येही बॉलिंग करतो. कोणत्याही टीमसाठी सुरूवात आणि शेवट महत्त्वाचा असतो, असं रोहित शर्मा म्हणाला आहे.

अर्शदीप हुकमी एक्का

advertisement
'अर्शदीप नवीन बॉल स्विंग करू शकतो आणि उजव्या हाताने बॅटिंग करणाऱ्या बॅटरच्या पॅडला लक्ष्य करू शकतो. नव्या बॉलने बॉलिंग करणाऱ्या बॉलरसाठी हे कौशल्य महत्त्वाचं आहे. अर्शदीप कायमच विकेट घेण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्याला पहिली ओव्हर दिली जाते', असं वक्तव्य रोहितने केलं आहे.
'2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही अर्शदीपने उत्कृष्ट बॉलिंग केली. मला अजूनही आठवतं त्याने क्विंटन डिकॉक सेट झाल्यानंतर त्याला आऊट केलं होतं. यानंतर 19 व्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 2 का 3 रन दिले होते, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर दबाव आला होता. या टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारताचा हुकमी एक्का ठरेल', असं भाकीत रोहित शर्माने वर्तवलं आहे.
advertisement

हार्दिकही ट्रम्प कार्ड

अर्शदीपप्रमाणेच हार्दिक पांड्याही टीममध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, असं रोहित म्हणाला आहे. 'हार्दिक जेव्हा टीममध्ये असतो तेव्हा तो बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही भूमिका बजावतो. टीमवर दबाव असताना त्याची बॅटिंग महत्त्वाची असते. 15-16 ओव्हरनंतर स्कोअर 160 असेल आणि हार्दिक क्रीजवर असेल तर तो स्कोअर 210-220 पर्यंत पोहोचवू शकतो. तसंच टीमने 50 रनमध्ये 4 विकेट गमावल्या असतील, तर इनिंगला आकार देऊ शकतो', असं म्हणत रोहितने हार्दिकचं कौतुक केलं आहे.
advertisement

कुलदीप-वरुणला एकत्र खेळवणं कठीण

'कुलदीप आणि वरुण या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण आहे. कॅप्टनसाठी दोघांनाही एकत्र मैदानात कसं उतरवायचं? हे सगळ्यात मोठं आव्हान असेल. मी टीममध्ये असतो तर दोघांनाही टीममध्ये घेतलं असतं, कारण दोघंही विकेट घेतात आणि बॅटरना त्यांच्या बॉलिंगचा अंदाज घेता येत नाही', अशी प्रतिक्रिया रोहितने दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : अभिषेक-बुमराह नाही... हे 2 खेळाडू जिंकवून देणार T20 वर्ल्ड कप, रोहित शर्माची मोठी भविष्यवाणी!
Next Article
advertisement
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली; सोने आणणाऱ्यांना बसला मोठा झटका
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली
  • दुबईत सोनं खरेदी करणं आता अशक्य

  • सामान्यांना मोठा झटका

  • सर्व गणितं कोलमडली

View All
advertisement