IND vs PAK : 15 बॉल 4 विकेट काढल्या,तरी पाकिस्तानच्या 300 पार धावा, भारतासमोर किती रन्सचे आव्हान?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दुबईच्या आयसीसीच्या अॅकडमीच्या मैदानावर अंडर 19 भारत आणि पाकिस्तान संघामध्ये रोमांचक सामना सूरू आहे.या सामन्यात पाकिस्तानने धडाकेबाज फलंदाजी केली होती.
India vs Pakistan, Under 19 Asia Cup 2025 : दुबईच्या आयसीसीच्या अॅकडमीच्या मैदानावर अंडर 19 भारत आणि पाकिस्तान संघामध्ये रोमांचक सामना सूरू आहे.या सामन्यात पाकिस्तानने धडाकेबाज फलंदाजी केली होती. यावेळी सामन्यात एक वेळ अशी आली होती पाकिस्तान 400 पार पोहोचू शकली असती. पण भारताच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत 15 बॉलमध्ये 4 विकेट काढल्या होत्या. पण इतके विकेट काढून देखील पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 347 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतासमोर 348 धावांचे आव्हान आहे.
advertisement
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली होती. पाकिस्तानकडून हमजा जहूर आणि समीर मिन्हास सलामीला उतरले होते. या दोघांनी 3 ओव्हरमध्ये 31 धावा काढल्या होत्या. त्यानंतर समीरने उस्मान खानसह पाकिस्तानचा डाव सारवला होता. हा डाव सावरताना पाकिस्तानचे एकामागून एक विकेट पडत होते. पण समीर मिन्हास एकटा भारताच्या गोलंदाजांना भिडत होता.
advertisement
समीर मिन्हासने एकट्याने 113 बॉलमध्ये 172 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीत त्याने 9 षटकार आणि 17 चौकार मारले आहेत. मिन्हास सोबत अहमद हुसेनने 56 धावांची खेळी केली. हे दोन्ही खेळाडू मैदानात पाकिस्तान 400 पार धावा करेल की काय?असे वाटत होते. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत शेवटच्या क्षणी 15 बॉलमध्ये 4 विकेट काढले होते.
advertisement
कनिष्क चौहाने 43 ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हुझेफा अहसनचा शुन्यावर विकेट काढला. त्यानंतर दिपेश देवंद्रनने 44 ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर फरहान हुसेनची विकेट काढली. त्यानंतर 45 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर हेनिल पटेल मोहम्मद शायनची विकेट घेतली. आणि नंतर 46 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर दिपेश देवेंद्रनने अब्दुल सुभानची विकेट घेतली. अशाप्रकारे भारताने 15 बॉलमध्ये 4 विकेट घेतल्या.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 3:02 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 15 बॉल 4 विकेट काढल्या,तरी पाकिस्तानच्या 300 पार धावा, भारतासमोर किती रन्सचे आव्हान?









