Smriti Mandhana : लग्न पुढं ढकलण्याचा निर्णय कुणाचा? पलाशच्या आईचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'हळद लागलेला नवरदेव जर...'

Last Updated:

Palash Muchhal Mother on Wedding Postpone : पलाश सध्या विश्रांती घेतोय. त्याची तब्येत देखील बिघडली होती. त्याची प्रकृती बरी होत आहे. दोन्ही कुटुंबं गेल्या दोन दिवसांच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

Palash Muchhal Mother on Wedding Postpone
Palash Muchhal Mother on Wedding Postpone
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding : टीम इंडियाची स्टार खेळाडू आणि वर्ल्ड कप विजेती खेळाडू स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा पुढं ढकलण्यात आला आहे. स्मृतीच्या वडिलांसह पलाशला देखील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. अशातच आता स्मृतीच्या होणाऱ्या सासूबाईंनी आणि पलाशच्या आईने मोठी अपडेट दिली आहे. अमिता मुच्छल काय म्हणाल्या? जाणून घ्या.

जोपर्यंत अंकल बरे होत नाहीत तोपर्यंत...

पलाश हा स्मृतीच्या वडिलांच्या फार जवळचा आहे. कदाचित तो स्मृतीपेक्षा जास्त तिच्या वडिलांना मानतो. त्यामुळे पलाशने आत्ताच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. स्मृतीपेक्षा जास्त पलाश त्यांच्यासाठी जवळचा आहे. जेव्हा श्रीनिवास यांची तब्येत बिघडली, तेव्हा स्मृतीच्या आधी पलाशने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. जोपर्यंत अंकल बरे होत नाहीत, तोपर्यंत लग्न नाही, असं पलाशने सर्वांना सांगितलं होतं. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना अमिता मुच्छल यांनी हे वक्तव्य केलंय.
advertisement

रडता रडता तब्येत बिघडली

पलाश सध्या विश्रांती घेतोय. त्याची तब्येत देखील बिघडली होती. त्याची प्रकृती बरी होत आहे. दोन्ही कुटुंबं गेल्या दोन दिवसांच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. लग्न पुढं ढकल्यानंतर तो वारंवार रडत होता. हळद लागल्यामुळे आम्ही नवरदेवाला बाहेर जाऊ देत नव्हतो. रडता रडता अचानक त्याची तब्येत बिघडली. चार तास त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं, असं पलाशच्या आईने सांगितलं.
advertisement

पलाशला मुंबईला आणण्यात आलंय

आयव्ही ड्रिप लावली, ईसीजी काढला आणखीही काही टेस्ट झाले. सगळं नॉर्मल आलंय, पण स्ट्रेस खूप होता, असं अमिता मुच्छल म्हणाल्या. आता त्याला मुंबईला आणण्यात आलंय. तो आता विश्रांती घेतोय, त्याची बहिण सांगलीला होती, आता ती देखील मुंबईला परत आली आहे, असंही पलाशच्या आईने म्हटलं आहे. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना रुग्णालयात असल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement

डॉ.नमन शहा यांनी काय सांगितलं?

दरम्यान, आमच्या कार्डिओलॉजीचे डॉ रोहन थाने यांनी देखील त्यांची प्रकृती पाहून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सध्या त्याचा बीपी वाढल्यामुळे त्यांचे ठोके देखील वाढले आहेत. त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहण्याची गरज आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण त्यांना बरं व्हायला एक दोन दिवस लागतील,अशी माहिती डॉ.नमन शहा यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : लग्न पुढं ढकलण्याचा निर्णय कुणाचा? पलाशच्या आईचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'हळद लागलेला नवरदेव जर...'
Next Article
advertisement
Arun Gawli BMC: मांडवली की फूट पडणार? डॅडीच्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?
'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?
  • 'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

  • 'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

  • 'डॅडी'च्या घरात उमेदवारीवरून महाभारत, दगडी चाळीत काकू विरुद्ध पुतणी?

View All
advertisement