IND vs PAK : एकेकाळी जेवणाचे हाल, लोकांनी केली थट्टा, आता तेच झाले फॅन, पाकिस्तानला धूळ चारणारी क्रांती कोण?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ICC महिला विश्वचषक 2025 च्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला. क्रांती गौडच्या घातक गोलंदाजीने भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
IND vs PAK Women : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला. रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ICC महिला विश्वचषक 2025 च्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला. क्रांती गौडच्या घातक गोलंदाजीने भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. तिने 10 षटकांत फक्त 20 धावा देत तीन विकेट घेतल्या. या उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरीसाठी तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. उजव्या हाताची वेगवान गोलंदाज क्रांती गौडने 10 षटकांत फक्त 20 धावा देत 3 बळी घेतले आणि पाकिस्तानविरुद्ध भारताच्या शानदार विजयात मोठी भूमिका बजावली.
सामन्यात काय घडलं?
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 247 धावा केल्या. स्मृती मानधनाने 23 आणि प्रतिका रावलने 31 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने 32, दीप्ती शर्माने 25 आणि स्नेह राणाने 20 धावा केल्या. यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने शेवटच्या षटकांमध्ये भारताला 247 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तिने 20 चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारांसह नाबाद 35 धावा केल्या. हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या. क्रांती गौड व्यतिरिक्त, दीप्ती शर्माने 9 षटकांत 45 धावांत 3 धावा दिल्या तर स्नेह राणाने २ बळी घेतले.
advertisement
247 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 43 षटकांत 159 धावांवरच गारद झाला. भारतीय गोलंदाजांसमोर टिकून राहिलेली पाकिस्तानची एकमेव फलंदाज सिद्रा अमीन होती. अमीनने 106 चेंडूत 81 धावा केल्या, ज्यात एक षटकार आणि नऊ चौकारांचा समावेश होता. नतालिया परवेझने 46 चेंडूत 33 धावा केल्या. सिद्रा नवाजने 14 धावा केल्या, तर इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
advertisement
सामनावीर ठरल्यानंतर क्रांती गौड काय म्हणाली?
या रोमांचक सामन्यात भारताने बाजी मारली, या सामन्यात क्रांती गौड सामनावीर ठरली. एकेकाळी पायात घालण्यासाठी चप्पल नव्हती पण आज भारताकडून खेळताना आणि सामनावीर म्हणून निवडल्यानंतर क्रांतीची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर क्रांतीने तिच्या गावातल्या लोकांबद्दल सांगितलं, सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर क्रांती गौर म्हणाली की, विश्वचषक सामन्यात सामनावीर होणे खूप छान वाटते. माझ्या गावातील लोकांना याचा अभिमान असेल. त्यांनी सामना पाहण्यासाठी गावात एक मोठा एलईडी स्क्रीन बसवला आहे. एकेकाळी जेवणाचे हाल असलेलया पोरीने आज तिच्या कुटुंबाचा आणि गावकऱ्यांचा मान वाढवला आहे. तिला वाईट परिस्थितीतही क्रिकेट खेळू दिल्यामुळे अनेकांनी त्यांची थट्टा केली पण आज त्यांनाच तिचा अभिमान असल्याचं ती म्हणाली. 22 वर्षीय क्रांती गौड मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील घुवारा येथील आहे. क्रांतीचा राष्ट्रीय संघात समावेश झाल्यानंतर तिचे मूळ गाव प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. उजव्या हाताची वेगवान गोलंदाज क्रांती गौडने 10 षटकांत फक्त 20 धावा देत 3 बळी घेतले आणि पाकिस्तानविरुद्ध भारताच्या दणदणीत विजयात मोठी भूमिका बजावली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 9:41 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : एकेकाळी जेवणाचे हाल, लोकांनी केली थट्टा, आता तेच झाले फॅन, पाकिस्तानला धूळ चारणारी क्रांती कोण?