हातावर हनुमानाचा टॅटू, Insta वर जय श्रीराम! पीएम मोदींसमोर दीप्तीने सांगितलं खास सीक्रेट म्हणाली...
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
वर्ल्ड कल्प जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या महिला क्रिकेट टीमने पीएम नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दीप्ति शर्मा आणि तिच्या श्रद्धेची विशेष चर्चा झाली.
मुंबई: वर्ल्ड कल्प जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या महिला क्रिकेट टीमने पीएम नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पीएम नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं तोंड भरुन कौतुक केलं आणि अभिनंदनही केलं. यावेळी त्यांच्यासोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, टीमने सुरुवातीला सलग तीन सामन्यांमध्ये अपयश मिळवलं, पण कठीण परिस्थितीमधून स्वत:ला सावरलं आणि ऐतिहासिक विजय मिळवला.
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी त्यांच्याशी संबंधित जुने किस्से आणि आठवणी ताज्या केल्या. काही खेळाडूंबद्दल खास उल्लेख करत त्यांनी त्यांच्या जुन्या गोष्टी आठवल्या. दीप्ति शर्माच्या हातावर हनुमानाचा टॅटू आहे. या टॅटूवरुन पीएम नरेंद्र मोदी यांनी कुतूहलाने प्रश्न विचारला होता. त्यावेळी दिप्तीने दिलेली प्रतिक्रिया दिली आहे. २०१७ मध्ये तुम्ही मला सांगितलं होतं की असा एक प्लेअर आहे जो याच अपयशातून पुन्हा प्रयत्न करुन उभं राहू शकतो. तुम्ही दिलेला हा मेसेज माझ्यासारखी एक खरी प्रेरणा ठरली. मी पुन्हा जास्त मेहनत घेतली आणि आज आम्ही हे यश खेचून आणलं आहे. तुमची भाषणं आमच्यासाठी प्रेरणादेणारी आहेत.
advertisement
हनुमानाचा टॅटू काढला आहे. ते तुला काय मदत करतात? असा प्रश्न पीएम नरेंद्र यांनी विचारला.
माझा माझ्यापेक्षा हनुमानावर जास्त विश्वास आहे. जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात कठीण परिस्थिती आली, तेव्हा हनुमानाचं नाव घेते आणि त्या परिस्थितीतून मी बाहेर पडले आहे. त्यामुळे माझी श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे त्यांच्यावर.
तुझ्या इन्स्टा अकाउंटवरही जय श्री राम लिहिलेलं आहे का?
हो, इन्स्टा अकाउंटवरही जय श्री राम लिहिलेलं आहे. श्रद्धा आयुष्यात खूप कामी येते. कठीण परिस्थितीमध्ये आपण त्याचं नाव घेऊन त्याच्यावर गोष्टी सोडून देतो आणि थोडे निर्धास्त होतो. तो सगळं ठीक करेल अशी एक आपली श्रद्धा असते अशी प्रतिक्रिया पीएम नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
advertisement
पंतप्रधान मोदी यांनी खेळाडू दीप्ती हिच्या बोलण्याकडे विशेष लक्ष दिले आणि तिच्यातील विश्वास, समर्पण या गुणांची प्रशंसा केली. दीप्ती केवळ क्रिकेटमध्येच नाही, तर आपल्या विनम्रता आणि श्रद्धेनेही आग्र्याचा मान वाढवत असल्याची भावना तिच्या होम टाऊनमधून व्यक्त होत आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी समितीच्या सदस्य तूलिका कपूर यांनी सांगितले की, दीप्तीने केवळ मैदानावरील खेळातच नाही, तर आपल्या आस्था आणि विनम्रतेने आग्र्याचे नाव मोठं केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 10:54 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हातावर हनुमानाचा टॅटू, Insta वर जय श्रीराम! पीएम मोदींसमोर दीप्तीने सांगितलं खास सीक्रेट म्हणाली...


