मोदींसोबत फोटोसेशन पण Jay Shah यांना एक गोष्ट खटकली, प्रतिका रावलसाठी ICC च्या अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय!

Last Updated:

Pratika Rawal world cup medal : प्रतिका रावलने सीएनएन न्यूज 18 ला पुष्टी दिली की, आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी तिला वर्ल्ड कप पदक मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप केला आहे.

Jay Shah intervened in Pratika Rawal world cup medal
Jay Shah intervened in Pratika Rawal world cup medal
Jay Shah intervened in Pratika Rawal world cup medal : टीम इंडियाच्या पोरींनी पहिल्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं अन् इतिहास रचला आहे. परंतू टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवण्यात प्रतिका रावल हिचा सर्वात मोलाचा वाटा होता. पण तिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मेडल मिळालं नाही. दुखापतीमुळे बाहेर होऊन सुद्धा तिला मेडल मिळायला हवं होतं, असं भारतीय फॅन्सने म्हटलं आहे. पण नियमानुसार असं होऊ शकत नाही. मात्र, आयसीसीच्या अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे.

प्रतिका रावलला मिळणार वर्ल्ड कप मेडल

प्रतिका रावलने सीएनएन न्यूज 18 ला पुष्टी दिली की, आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी तिला वर्ल्ड कप पदक मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप केला आहे. पीएम मोदी यांच्यासोबतच्या मिटिंगमध्ये तिने जे परिधान केलं होते ते सपोर्ट स्टाफ मेडल होतं पण तिला लवकरच स्वतःचं पदक मिळणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या नियमानुसार, जे खेळाडू संघाचा अधिकृत भाग आहेत अशाच खेळाडूंना मेडल दिलं जातं. दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यामुळे तिच्या बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली होती. तिच्या जागी शेफाली वर्माला मेडल देण्यात आलं होतं. अशातच आता जय शहा यांनी पुढाकार घेतल्याने प्रतिका रावल हिला वर्ल्ड कपच मेडल मिळणार आहे.
advertisement

अमनजोत कौरने मन जिंकलं

दरम्यान, भारतीय खेळाडूंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान मोदींनी खेळाडूंसोबत फोटोशूट केलं. या फोटोशूटसाठी प्रतिका रावळ देखील उपस्थित होती. सर्व खेळाडूंनी वर्ल्डकप विनिंग मेडल देखील गळ्यात घातलं होतं. प्रतिका रावळला वर्ल्डकप विनिंग मेडल दिलं गेलेलं नाही. पण अमनजोत कौरने आपलं मेडल प्रतिकाला दिलं. अमनजोत कौरच्या या कृतीचं जोरदार कौतुक होत आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मोदींसोबत फोटोसेशन पण Jay Shah यांना एक गोष्ट खटकली, प्रतिका रावलसाठी ICC च्या अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement