VIDEO: पृथ्वी शॉची LIVE मॅचमध्ये 'भाईगिरी', सरफराजच्या भावाला बॅटने मारलं,अंपायरने ढकलंत ढकलंत बाहेर काढलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पृथ्वी शॉचा मैदानात संयम सुटला आणि तो प्रतिस्पर्धी खेळाडू असलेला सरफराज खानचा भाऊ मुशी खानला बॅटने मारायला धावला होता.मुशीर खानने त्याची विकेट घेताच मैदानात राडा झाला होता.
Prithvi Shaw Musheer Khan : पृथ्वी शॉ आणि वाद हा नवीन विषय राहिला नाही.आजकाल जिकडे पृथ्वी शॉ तिकडेच वाद होतोच.अशात आता पृथ्वी शॉने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे.या वादात पृथ्वी शॉचा मैदानात संयम सुटला आणि तो भाईगिरी करताना दिसला आहे. पृथ्वी शॉचा वाद झाला आणि तो प्रतिस्पर्धी खेळाडू असलेला सरफराज खानचा भाऊ मुशीर खानला बॅटने मारायला धावला होता.मुशीर खानने त्याची विकेट घेताच मैदानात राडा झाला होता.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.या घटनेने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे.
खरं तर रणजी ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र आणि मुंबई संघात सराव सामना सूरू आहे. या सामन्यात महाराष्ट्र संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने शतकीय खेळी केली होती.त्यानंतर पुढे जाऊन तो द्विशतक मारण्याच्या उंबरठ्यावर होता. याचवेळी मुशीर खानच्या बॉलवर स्विप मारण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉ कॅचआऊट झाला होता. पृथ्वी शॉ ज्यावेळेस आऊट झाला तेव्हा तो 220 बॉलमध्ये 181 धावांवर खेळत होता.त्यामुळे द्विशतकापासून अवघ्या 19 धावा दूर असताना तो आऊट झाला होता. त्यामुळे पृथ्वी शॉ प्रचंड रागावला होता.
advertisement
We got Prithvi Shaw vs Mumbai before GTA VI
He had an argument with Musheer Khan after being dismissed for 181(220) in the warmup match between Maharashtra vs Mumbai before Ranji Trophy 2025-26.#PrithviShaw #Mumbai #Maharashtra #Cricket pic.twitter.com/OXeFOSHx9P
— Abhijeet (@alsoabhijeet) October 7, 2025
advertisement
दरम्यान आऊट होताच पृथ्वी शॉचा संयम सुटला आणि तो थेट मुंबईच्या खेळाडूंसोबत जाऊन भिडला. व्हायरल व्हिडिओत तर असं दिसतेय, पृथ्वी शॉ बॅट घेऊन मुशीर खानच्या मागे त्याला मारायला धावला आहे.पण बॅट लागण्यापासून काहीसा तो वाचला होता. बॅट त्याला काही लागत नाही. या दरम्यान मैदानातील अंपायरने लगेच मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच अंपायर त्याला मैदानातून ढकलंत ढकलंत बाहेर काढताना दिसले.
advertisement
दरम्यान पृथ्वी शॉचा नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला होता, हे समजू शकले नाही आहे. पण मैदानातला राडा भयंकर होता.अख्खी टीम मैदानात जमली होती.या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.त्यामुळे या राड्यामुळे पृथ्वी शॉ नवीन वादात सापडला आहे.
दरम्यान यापूर्वी पृथ्वी शॉने स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते परंतु खराब कामगिरीमुळे तो वारंवार बाद होत होता. यामुळे शॉ चांगल्या संधींच्या आशेने महाराष्ट्रात सामील झाला. आता, मुंबई सोडल्यानंतर, तो आगामी स्थानिक हंगामात महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसतो आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 7:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO: पृथ्वी शॉची LIVE मॅचमध्ये 'भाईगिरी', सरफराजच्या भावाला बॅटने मारलं,अंपायरने ढकलंत ढकलंत बाहेर काढलं