VIDEO : बेन स्टोक्सच्या सनसनाटी आरोपावर जडेजा खणखणीत प्रत्युत्तर, इंग्लंडच्या कॅप्टनकडून रडीचा डाव, नेमकं काय झालं?

Last Updated:

Jadeja Woakes Viral Video : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांच्यात चांगलीच शा‍ब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता जड्डूने खणखणीत प्रत्युत्तर दिलंय.

Jadeja On Ben Stokes Accusation
Jadeja On Ben Stokes Accusation
Jadeja On Ben Stokes Accusation : एजबेस्टन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांच्यात वाद पेटल्याचं पहायला मिळालं होतं. टीम इंडियाचा स्कोरबोर्ड बुलेट ट्रेनप्रमाणे धावत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी रडीचा डाव खेळण्यात सुरूवात केली. जडेजा आणि बेन स्टोक्स यांच्यात मैदानावर शाब्दिक बाचाबाची झाली. पहिल्या दिवशी यशस्वी जायस्वालसोबतच्या वादावादीनंतर, स्टोक्स पुन्हा चर्चेत आला, जेव्हा ख्रिस वोक्सने अंपायर्सकडे जडेजाविरुद्ध तक्रार केली. तेव्हा स्टोक्सने वादाला तोंड फोडलं.

इंग्लंडच्या खेळाडूंची बिनबुडाचा आरोप

इंग्लिश खेळाडूंचा आरोप होता की, जडेजा पिचच्या 'डेंजर एरिया'मध्ये धावत होता, ज्यामुळे पीचवर पायांच्या खुणा उमटत होत्या. इंग्लंड खेळाडूंच्या आणि कॅप्टनच्या मते, जडेजा जाणूनबुजून असं करत होता. स्टोक्सने जडेलाला थेट विचारले, "हे काय केलेस तू?" यावर जडेजाने स्वतःचा बचाव करत स्पष्टीकरण दिलं होतं.

माझं लक्ष बॅटिंगवर होतं - जडेजा

advertisement
यावर जडेजाने स्वतःचा बचाव करत स्पष्टीकरण दिलं की, "मी इथून येत होतो. मी तिथे बॉलिंग करणारच नाहीये. मी असं का करेन? माझे लक्ष बॅटिंगवर आहे." स्टोक्ससोबत झालेल्या संभाषणाबद्दल बोलताना जडेजाने सांगितले की, पिचवर 'रफ' पॅच तयार करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता.
advertisement

माझा तो हेतू नव्हता - रविंद्र जडेजा

सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जडेजा म्हणाला, "त्याला वाटतं की मी स्वतःसाठी पिच रफ करत आहे. उलट, तो फास्ट बॉलर्स वापरून पिच अधिक रफ करत होता. मला रफ करायची गरजच नव्हती. तो वारंवार अंपायरला सांगत होता की मी विकेटवर धावत आहे. पण माझा तो हेतू नव्हता. मी काही वेळा इकडे-तिकडे धावलो असेन. पण तशी कल्पना देखील माझ्या मनात नव्हती. उद्या आम्हाला संधी मिळाली तर आम्ही चांगल्या एरियामध्ये बॉलिंग करण्याचा प्रयत्न करू आणि शक्य तितके चांगले खेळण्याचा प्रयत्न करू."
advertisement

कपिल देवची बरोबरी

दरम्यान, जडेजाने दुसऱ्या दिवशी महत्त्वपूर्ण 89 रन्सची खेळी केली. त्याने कर्णधार शुभमन गिलसोबत सहाव्या विकेटसाठी 203 रन्सची दमदार पार्टनरशिप केली, ज्यामुळे भारताला 587 रन्सचा मजबूत स्कोर उभारण्यास मदत झाली. या खेळीमुळे भारताची 211/5 अशी बिकट अवस्था सुधारली आणि संघाने मोठी धावसंख्या गाठली. जडेजाने SENA (साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये नंबर 7 किंवा त्याखालील स्थानावर बॅटिंग करताना सर्वाधिक 50+ स्कोअर करणाऱ्या भारतीयांच्या यादीत कपिल देवची बरोबरी साधली आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : बेन स्टोक्सच्या सनसनाटी आरोपावर जडेजा खणखणीत प्रत्युत्तर, इंग्लंडच्या कॅप्टनकडून रडीचा डाव, नेमकं काय झालं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement