भारताने धुतल्यानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये उभी फूट, आघाचा गेम ओव्हर, हाकलेला खेळाडू होणार कॅप्टन!

Last Updated:

आशिया कपमध्ये टीम इंडियाकडून तीनही वेळा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे.

भारताने धुतल्यानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये उभी फूट, आघाचा गेम ओव्हर, हाकलेला खेळाडू होणार कॅप्टन!
भारताने धुतल्यानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये उभी फूट, आघाचा गेम ओव्हर, हाकलेला खेळाडू होणार कॅप्टन!
कराची : आशिया कपमध्ये टीम इंडियाकडून तीनही वेळा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये सलमान अली आघाची कॅप्टन्सी जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सलमान अली आघाच्या ऐवजी नवा कर्णधार कोण होणार? याचं नावही समोर आलं आहे. पाकिस्तानचा अनुभवी ऑलराऊंडर शादाब खान पाकिस्तानच्या टी-20 टीमचा कर्णधार होऊ शकतो.
शादाब खानने आतापर्यंत पाकिस्तानकडून 70 वनडे आणि 112 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. खराब कामगिरीनंतर शादाब खानला पाकिस्तानच्या टीममधून बाहेर केलं गेलं होतं, त्यानंतर त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. शादाब खानच्या खांद्यावर या वर्षाच्या सुरूवातीला लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती, तेव्हापासून तो टीममधून बाहेर आहे. खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर शादाब खान फिट झाला आहे, तसंच तो पुढच्या महिन्यात कमबॅक करू शकतो. शादाब खान हा शस्त्रक्रियेआधी टीमचा उपकर्णधार होता, त्यामुळे आता तो टीममध्ये आला तर त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती होऊ शकते.
advertisement

श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानची सीरिज

पाकिस्तान क्रिकेटमधल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शादाब 11 ते 15 नोव्हेंबरदरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमधून पुनरागमन करू शकतो, कारण त्याचं रिहॅब चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पुढच्या वर्षी होणारा वर्ल्ड कप लक्षात घेता त्याला टीमचा कर्णधार म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं.
पाकिस्तानने सलमान अली आघाच्या नेतृत्वात आशिया कप खेळला होता, पण फायनलमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्ध पराभव झाला होता, त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नवा कर्णधार नियुक्त करण्याच्या विचारात आहे. सध्या पाकिस्तानची टीम घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे, या सीरिजच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला आहे. याचसोबत पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारताने धुतल्यानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये उभी फूट, आघाचा गेम ओव्हर, हाकलेला खेळाडू होणार कॅप्टन!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement