IPL इतिहासातला महागडा खेळाडू, कोट्यवधींची कमाई, तरी 241 जणांकडून 399 रुपये का घेतो ऋषभ पंत?

Last Updated:

टीम इंडियामधल्या सध्याच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून ऋषभ पंतचं नाव घेतलं जातं, खासकरून टेस्ट क्रिकेटमध्ये ऋषभ पंतने त्याच्या छोट्याशा करिअरमध्ये टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिले.

IPL इतिहासातला महागडा खेळाडू, कोट्यवधींची कमाई, तरी 241 जणांकडून 399 रुपये का घेतो ऋषभ पंत?
IPL इतिहासातला महागडा खेळाडू, कोट्यवधींची कमाई, तरी 241 जणांकडून 399 रुपये का घेतो ऋषभ पंत?
मुंबई : टीम इंडियामधल्या सध्याच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून ऋषभ पंतचं नाव घेतलं जातं, खासकरून टेस्ट क्रिकेटमध्ये ऋषभ पंतने त्याच्या छोट्याशा करिअरमध्ये टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. ऋषभ पंत हा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू आहे. आयपीएल 2025 च्या लिलावात लखनऊ सुपर जाएंट्सने पंतला 27 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. याशिवाय बीसीसीआयचं कॉन्ट्रॅक्ट आणि जाहिरातींमधूनही पंत कोट्यवधींची कमाई करतो, असं असलं तरीही पंत काही लोकांकडून 399 रुपये घेतो.
बीसीसीआयने ऋषभ पंतला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ए ग्रेडमध्ये ठेवलं आहे, त्यामुळे त्याला वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. तसंच तो टीम इंडियासाठी जेवढ्या मॅच खेळतो त्यासाठी त्याला बीसीसीआय वेगळी मॅच फी देखील देतं. एका टेस्टसाठी खेळाडूला 15 लाख रुपये, तसंच वनडेसाठी 6 लाख रुपये आणि टी-20साठी 3 लाख रुपये मिळतात.

ऋषभ पंत का घेतो 399 रुपये?

advertisement
ऋषभ पंत सध्या टीम इंडियाचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. असं असलं तरी तो 241 जणांकडून 399 रुपये घेतो. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ऋषभ पंतची या 241 जणांकडून दर महिन्याला 399 रुपयांची कमाई होते. हे 241 जण ऋषभ पंतला इन्स्टाग्रामवर फक्त फॉलोच करत नाहीत, तर त्याचे सबस्क्रायबर्सही आहेत.
या 241 सबस्क्रायबर्सना ऋषभ पंत त्याचे खास फोटो आणि व्हिडिओही शेअर करतो, जे त्याच्या इतर 15 मिलियन फॉलोअर्सना बघायला मिळत नाहीत. एवढंच नाही तर पंतच्या सबस्क्रायबर्सने त्याला एखादा प्रश्न विचारला तर, पंत त्याला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देतो. टीम इंडियाकडून असं करणारा पंत एकमेव क्रिकेटर आहे.
advertisement

दुखापतीमुळे पंत बाहेर

टीम इंडियाकडून 150 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा ऋषभ पंत सध्या मैदानातून बाहेर आहे. इंग्लंड दौऱ्यातल्या चौथ्या टेस्टमध्ये खेळताना ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो 6 आठवडे बाहेर झाला आहे. इंग्लंड दौऱ्यातल्या 4 टेस्ट मॅचमध्ये त्याने 479 रन केले. आता 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज सीरिजमधून पंत मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL इतिहासातला महागडा खेळाडू, कोट्यवधींची कमाई, तरी 241 जणांकडून 399 रुपये का घेतो ऋषभ पंत?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement