Jemimah Rodrigues : गिटार हातात धरली अन् जेमिमाने सुर लावला; रोहितसह अमिताभ बच्चन बघतच राहिले, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Jemimah Rodrigues guitar performace Video : जेमिमाने यावेळी 'आशाएँ खिलें दिल की...' हे गाणं जेमिमाने सर्वांसमोर सादर केलं. यावेळी तिचं गाणं ऐकून रोहित शर्मा आणि इतर सदस्य देखील शॉक झाले. अमिताभ बच्चन यांना देखील याचं कौतुक वाटलं.
Jemimah Rodrigues Performace Video : टीम इंडियाच्या पोरी कुठंही कमी पडत नाही, याचं उदाहरण अनेकदा समोर आलंय. देशाची मान उंचावण्यापासून ते वर्ल्ड कप सिलेब्रेशन करताना देखील दिसतात. प्रत्येक क्षण साजरा करण्यासाठी पोरी उत्सुक असतात. यात टीम इंडियाची लिडर असते स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज... जेमिमा रॉड्रीग्ज नेहमी आपल्या कलाकारीने सर्वांचं मनोरंजन करते. अशातच आता मुंबई इंडियन्सने जेमिमा रॉड्रीग्जचा व्हिडीओ शेअर केला आहे.
कलाकारीची झलक दाखवली
टीम इंडियाच्या वर्ल्ड कप स्टार खेळाडू रिलायन्स फाउंडेशनच्या ‘युनायटेड इन ट्रायम्फ’ कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तर त्यावेळी रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी देखील हजेरी लावली होती. तसेच बिग बी अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि टीम इंडियाचे इतर खेळाडू देखील उपस्थित होते. अशातच यावेली जेमिमाने आपल्या कलाकारीची झलक यावेळी दाखवली.
advertisement
गाणं ऐकून रोहित शर्मा शॉक
रिलायन्स फाउंडेशनच्या ‘युनायटेड इन ट्रायम्फ’ या विशेष कार्यक्रमात जेमिमा रॉड्रीग्जने सर्वांचं मन जिंकलं. जेमिमाने यावेळी 'आशाएँ खिलें दिल की...' हे गाणं जेमिमाने सर्वांसमोर सादर केलं. यावेळी तिचं गाणं ऐकून रोहित शर्मा आणि इतर सदस्य देखील शॉक झाले. अमिताभ बच्चन यांना देखील याचं कौतुक वाटलं. हरमनप्रीत कौरने देखील टाळ्या वाजवत तिला दाद दिली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
पाहा Video
Indian Women's Team batting sensation Jemimah Rodrigues showed off her artistic side with a musical medley at the #UnitedinTriumph event. pic.twitter.com/U1e3Lq4wFi
— Mumbai Indians (@mipaltan) January 7, 2026
एकमेकांचा हात पकडून कार्यक्रमात एन्ट्री
advertisement
दरम्यान, या कार्यक्रमात प्रेरणादायी क्षण, क्रीडा-समर्थन आणि सामाजिक उपक्रमांबाबत सकारात्मक संदेश देण्यात आला. तर टीम इंडियाचे आयसीसी ट्रॉफी जिंकणारे खेळाडू यावेळी उपस्थित होते. या विशेष सोहळ्यात क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची प्रेयसी महिका शर्मा देखील उपस्थित होती. या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांचा हात पकडून कार्यक्रमात एन्ट्री घेतली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 2:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jemimah Rodrigues : गिटार हातात धरली अन् जेमिमाने सुर लावला; रोहितसह अमिताभ बच्चन बघतच राहिले, पाहा Video









