Rohit Sharma : 'तू काय मला सांगतो...', रोहितने शॉट मारून दाखवला, गंभीरचा चेहरा पडला, ड्रेसिंग रूमच्या आतला Video लिक!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांचीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेनंतर गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांचा ड्रेसिंग रूममधला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आक्रमकपणे गौतम गंभीरसोबत बोलताना दिसत आहे.

'तू काय मला सांगतो...', रोहितने शॉट मारून दाखवला, गंभीरचा चेहरा पडला, ड्रेसिंग रूमच्या आतला Video लिक!
'तू काय मला सांगतो...', रोहितने शॉट मारून दाखवला, गंभीरचा चेहरा पडला, ड्रेसिंग रूमच्या आतला Video लिक!
रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांचीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 17 रननी विजय झाला आहे. विराट कोहलीचं धमाकेदार शतक आणि रोहित शर्माच्या अर्धशतकामुळे भारताने मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारली. तर बॉलिंगमध्ये कुलदीप यादव, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांनी अचूक बॉलिंग करत भारताचा विजय निश्चित केला. एकीकडे पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा विजय झाला असला तरी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे कोच गौतम गंभीरसोबत खटके उडाल्याची वृत्त समोर येत आहेत.
रांचीमधल्या वनडेनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधले काही फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीर यांच्यात वाद असल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत. शतक केल्यानंतर विराट ड्रेसिंग रूममध्ये आला त्यानंतर गंभीरने त्याला मिठी मारली, पण दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसलं नाही.
विराट आणि गंभीरचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता रोहित शर्मा आणि गौतम गंभीर याचाही ड्रेसिंग रूममधला व्हिडिओ बाहेर आला आहे. मॅच संपल्यानंतर गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात कोणत्यातरी मुद्द्यावरून तिखट चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित नकारार्थी मान हलवून एक शॉट मारून दाखवत आहे. तर चेहरा पडलेला गौतम गंभीर रोहितचं म्हणणं ऐकून घेत आहे.
advertisement
समोर आलेल्या या फोटो आणि व्हिडिओमध्ये रोहित आणि गंभीर नेमकं काय बोलत आहेत? हे समजत नसलं तरी दोघांमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावर गंभीर चर्चा सुरू असल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे.

टीम इंडियाचा विजय

advertisement
या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने 8 विकेट गमावून 349 रन केले. विराटने 11 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीने 135 रनची खेळी केली. तर रोहितने आक्रमक 57 रन केले. कर्णधार केएल राहुलने 60 रनचं महत्त्वाचं योगदान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा 332 रनवर ऑलआऊट झाला. कुलदीपने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर हर्षित राणा आणि अर्शदीपलाही प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. हर्षित राणाने त्याच्या दोन्ही विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू ब्रेट्जकीने 72, मार्को यानसनने 70 आणि कॉर्बिन बॉशने 67 रन केले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'तू काय मला सांगतो...', रोहितने शॉट मारून दाखवला, गंभीरचा चेहरा पडला, ड्रेसिंग रूमच्या आतला Video लिक!
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement