Aagri Style Mutton: लेकीच्या हळदीला बनवा झणझणीत आगरी मटण,रेसिपीचा सोप्पा VIDEO

Last Updated:

काही मटणप्रेमी नक्कीच मटण खाण्यासाठी वेगवेगळया कार्यक्रमांमध्ये आपल्याला आवर्जून बघायला मिळतात. चला त्याच पद्धतीतलं सेम स्टाईलच्या मटणाची आपण आज कृती जाणून घेणार आहोत.

+
झणझणीत

झणझणीत मसालेदार मटण 

मटणावर ताव मारायचं म्हटलं की, झणझणीत मटण, नाका तोंडातून पाणी आले पाहिजे. तसा योग बऱ्याच हळदी समारंभात पार्टीत अन्य सोहळ्यामध्ये किंवा जत्रेमध्ये नक्कीच येतो. आणि मटण प्रेमी असाल तर प्रश्नच मिटला अशाच मटण प्रेमी आणि खवय्येगिरींसाठी आम्ही घेऊन आलोय खास आगरी पद्धतीतले झणझणीत मसालेदार मटण. ज्या मटणाची चव आपण हळदी लग्नात नक्कीच बघतो. त्यामुळे काही मटणप्रेमी नक्कीच मटण खाण्यासाठी या कार्यक्रमात आवर्जून बघायला मिळतात. चला त्याच पद्धतीतलं सेम स्टाईलचं मटण आपण आज बनवणार आहोत.
साहित्य:
  • 500gm मटण (बकरीचे मांस)
  • 3 कांदे, बारीक चिरलेले
  • 1.5 कप भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट
  • 1 चमचा हळद पावडर
  • 3 चमचे घरगुती आगरी मसाला
  • 1 चमचा गरम मसाला
  • तडी मसाला
  • 1 चमचा जिरे आणि धणे पावडर
  • 1 टोमॅटो
  • 1 बटाटा (छोटे काप केलेले)
  • अख्खा गरम मसाला (लवंग, वेलची, दालचिनी, काळीमिरी, तेजपत्ता)
  • कडीपत्ता
कृती:
  • मटण शिजवणे: मटण प्रेशर कुकरमध्ये तेल घालून, कांदा परतून घ्या आणि मग मटण, हळद, गरम मसाला, जिरे-धणे पावडर आणि मीठ घालून चांगले मिसळा.
  • मसाला तयार करणे: कांदा आणि खोबरे मंद आचेवर भाजून घ्या आणि त्यांची पेस्ट बनवा. यामध्ये तिखट आणि मीठ घाला.
  • शिजवणे: प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून मटण शिजवा.
  • ग्रेव्ही तयार करणे: मटण शिजल्यानंतर, प्रेशर कमी झाल्यावर झाकण उघडा आणि त्यात भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट आणि
  • घरगुती मसाला घालून मिश्रण एकत्र करा.
  • शेवटची तयारी: ग्रेव्ही खूप जाड वाटल्यास थोडे पाणी घाला. मिश्रण एकजीव होईपर्यंत शिजवा.
  • तयार: गरमागरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा.
advertisement
टीप: तुम्ही तुमच्या आवडीनुसार आगरी मसाला आणि इतर मसाले वापरू शकता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Aagri Style Mutton: लेकीच्या हळदीला बनवा झणझणीत आगरी मटण,रेसिपीचा सोप्पा VIDEO
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement