Rohit Sharma Video : 'अभी मैं तेरेको दिखाता हूँ', इलेक्ट्रिक पेनने रोहितने दिला धवल कुलकर्णीला शॉक, हसून हसून तुमचंही पोट दुखेल!

Last Updated:

Rohit Sharma Electric Pen Video : धवलला काय झालं? याचा अंदाल लागत नाही. धवलच्या डोक्यात मुंग्या येतात. धवल कुलकर्णीला जोरदार करंट लागतो आणि तो पेन त्याच्या हातून खाली पडतो.

Rohit Sharma Electric Pen Video
Rohit Sharma Electric Pen Video
Rohit Sharma Viral Video : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत आल्यानंतर माजी भारतीय कॅप्टन रोहित शर्मा सध्या क्रिकेटपासून दूर कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवत आहे. मागील काही महिन्यांपासून तो सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे आणि नेहमी व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत आहेत. गुरूवारी रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक असाच मजेशीर व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो आपल्या मित्रांसोबत शॉक पेन प्रँक करताना दिसत आहेत.

रोहितला येड्यात काढण्याचा प्रयत्न

व्हिडिओच्या सुरुवातीला रोहितच्या एका जवळच्या व्यक्तीने त्याच्याकडे पेन वाढवत विचारलं, "रो, तू ऑटोग्राफ देऊ शकतोस का?" रोहितने त्या मित्राच्या हातातून पेन घेतला आणि तो बारकाईने पाहिला. त्यानंतर तो म्हणाला, "हा पेन नाहीये. याच्यात काय आहे, हे मला माहीत आहे. मी तुला आता सांगतो." पुढे रोहित शर्मा म्हणतो की, "मी याचा उपयोग एका व्यक्तीवर करेन, जो खूप स्पेशल आहे." त्यानंतर रोहित तो पेन आपल्या दुसऱ्या एका मित्राला पकडून ऑटोग्राफ देण्यास सांगतात. याचवेळी त्याचा दुसरा मित्र त्या व्यक्तीला, "तू किती फेमस झाला आहेस," असं म्हणतो.
advertisement

रोहितने मित्रालाच दिला शॉक

पण, जसा रोहितचा तो मित्र पेनचे बटन दाबून उघडण्याचा प्रयत्न करतो, त्याला जोरदार करंट लागतो. हे पाहून रोहित शर्मा मोठ्याने हसतात आणि त्याला विचारतात, "काय झालं?" यानंतर रोहित मुंबई रणजी टीमच्या जिममध्ये पोहोचतो. तिथे वर्क आउट करणाऱ्या धवल कुलकर्णीला पेन देऊन तो त्याला ऑटोग्राफ देण्यास सांगतो.
advertisement
advertisement

धवलच्या डोक्यात मुंग्या

दरम्यान, धवलला काय झालं? याचा अंदाल लागत नाही. धवलच्या डोक्यात मुंग्या येतात. धवल कुलकर्णीला जोरदार करंट लागतो आणि तो पेन त्याच्या हातून खाली पडतो. हे बघून रोहित आणखी जोरात हसताना दिसतोय. शेजारी उभ्या असलेल्या शार्दुल ठाकूरला देखील हसू आवरलं नाही. या व्हिडीओवर अथर्व सुदामेसह अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma Video : 'अभी मैं तेरेको दिखाता हूँ', इलेक्ट्रिक पेनने रोहितने दिला धवल कुलकर्णीला शॉक, हसून हसून तुमचंही पोट दुखेल!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement