CSK च्या कर्णधाराचा मोठा डाव, एका क्षणात संघ बदलला; टीम इंडियाला धोका देत इंग्लंडमध्ये…

Last Updated:

भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाड काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन वन आणि एकदिवसीय कपच्या पाच सामन्यांसाठी यॉर्कशर संघात सामील होईल. यॉर्कशरला जुलैमध्ये सरे विरुद्ध काउंटी सामना खेळायचा आहे. गायकवाड हंगामाच्या शेवटपर्यंत संघासोबत राहील.

News18
News18
Ruturaj Gaikwad : भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाड काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन वन आणि एकदिवसीय कपच्या पाच सामन्यांसाठी यॉर्कशर संघात सामील होईल. यॉर्कशरला जुलैमध्ये सरे विरुद्ध काउंटी सामना खेळायचा आहे. गायकवाड हंगामाच्या शेवटपर्यंत संघासोबत राहील. क्लबने त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती दिली. गायकवाड सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या इंडिया अ संघाचा भाग आहे ज्याने इंग्लंड लायन्स विरुद्ध दोन अनधिकृत चार दिवसीय कसोटी सामने खेळले.
ऋतुराजची आयपीएलमधली कामगिरी
गेल्या वर्षी म्हणजेच 2024 पासून ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सांभाळत आहे. धोनीनंतर ऋतुराज गायकवाडने कर्णधार पदाची धुरा सांभाळली आणि संघासाठी उत्तम कामगिरी देखील केली. गेल्या हंगामांत त्याने उत्तम कामगिरी केली पण या हंगामात त्याची कामगीरी फार चांगली राहिली नाही आणि या हंगामात आयपीएलमधून सर्वात पहिला बाहेर पडणारा चेन्नई सुपर किंग्ज हा पहिला संघ ठरला. ऋतुराजला दुखापत झाल्यामुळे तो हंगामाच्या मध्यातच बाहेर पडला.
advertisement
भारत अ संघासाठी ऋतुराज बेंचवर
ऋतुराज गायकवाडला दोन्ही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये तो इंडिया अ संघाचा कर्णधार होता. पण या दौऱ्यात तो बेंचवरच राहिला. त्याला कसोटी मालिकेसाठीही संघात स्थान मिळालेले नाही. तो आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार होता . पण दुखापतीमुळे तो लीगमधून मध्यंतरी बाहेर पडला होता. आता इंडिया अ संघ 13 ते 16 जून दरम्यान बेकेनहॅममध्ये भारतीय वरिष्ठ संघाविरुद्ध चार दिवसांचा सामना खेळणार आहे. या सामन्यात ऋतुराजला संधी मिळू शकते.
advertisement
यॉर्कशरने त्यांच्या वेबसाइटवर लिहिले आहे की, 'पुण्याचे रहिवासी आणि इंडियन प्रीमियर लीगच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रणजी ट्रॉफीच्या महाराष्ट्र संघाचे कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी सहा एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हा उजव्या हाताचा फलंदाज टॉप फोरमध्ये कुठेही येऊ शकतो आणि त्याने भारतासाठी डावाची सुरुवातही केली आहे.' गायकवाड म्हणाला की, मला नेहमीच येथे काउंटी क्रिकेट खेळायचे होते आणि इंग्लंडमध्ये यॉर्कशरपेक्षा मोठा क्लब नसेल.
advertisement
ऋतुराज गायकवाडची कारकीर्द
28 वर्षीय ऋतुराज गायकवाडने 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 115 धावा आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 633 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याने एक शतक ठोकले आहे. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली भारताने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने आतापर्यंत 38 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 41.77 च्या सरासरीने 2632 धावा केल्या आहेत. 86 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याची सरासरी 56.15 आहे. त्याने 16 शतके आणि 17 अर्धशतकांसह 4324 धावा केल्या आहेत.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK च्या कर्णधाराचा मोठा डाव, एका क्षणात संघ बदलला; टीम इंडियाला धोका देत इंग्लंडमध्ये…
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement