Sara Tendulkar : डीपफेक फोटोंवरुन सारा तेंडुलकरनं झापलं, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Last Updated:

सारा तेंडुलकर कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. विशेषतः ती तिच्या रिलेशनशिप अफवांवरुन कायमच केंद्रबिंदू ठरते.

डीपफेक फोटोंवर सारा तेंडुकरनं झापलं
डीपफेक फोटोंवर सारा तेंडुकरनं झापलं
मुंबई, 23 नोव्हेंबर : 'गॉड ऑफ द क्रिकेटर' सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. विशेषतः ती तिच्या रिलेशनशिप अफवांवरुन कायमच केंद्रबिंदू ठरते. तिचे अनेक फेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. अशातच फेक फोटो पोस्ट करणाऱ्यांवर सारा चांगलीच संतापली आहे. तिनं आता याविषयी पोस्ट शेअर करत फेक फोटो टाकणाऱ्यांना झापलं आहे.
वर्ल्ड कप 2023 दरम्यान साराविषयी अधिक फेक फोटो समोर आले. याविषयी तिनं आता पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. सारा म्हणाली, 'सोशल मीडिया हे आपल्या सर्वांसाठी आनंद, दु:ख आणि दैनंदिन गोष्टी शेअर करण्याचं चांगलं माध्यम आहे. मात्र तंत्रज्ञानाचा गैरवापर होणं हे अस्वस्थ करणारं आहे कारण ते इंटरनेटचं सत्य आणि खरेपणा हिरावून घेत आहे.'
advertisement
सारा पुढे म्हणाली, ट्विटरवरचे काही अकाऊंट चुकीचे आणि फेक फोटो टाकून माझे विडंबन करत आहे. माझं ट्विटरवर कुठलंही अकाऊंट नाही आणि ट्विटरनं याविषयी अॅक्शन घेऊन असे फेक गोष्टी पसरवणारे अकाऊंट सस्पेंड केले पाहिजे. दिशाभूल करण्याच्या आणि तोतयागिरी करण्याच्या हेतूने बनवलेली अकाऊंट बंद झाली पाहिजे.
advertisement
मनोरंजन कधीही खोट्या गोष्टींवर होऊ नये. त्यामुळे विश्वास आणि वास्तवावर आधारित संवादाला प्रोत्यासहन देऊया, असंही सारा म्हणाली. सारानं केलेली ही पोस्ट सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, भारताचा क्रिकेटर शुभमन गिलसोबत साराचं नातं जोडलं जात आहे. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे दोघांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले जातात. यातील काही फेक असतात. दोघांनाही बऱ्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. मात्र अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्यांवर शिक्कामोर्तब केलेला नाही.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sara Tendulkar : डीपफेक फोटोंवरुन सारा तेंडुलकरनं झापलं, पोस्ट शेअर करत म्हणाली...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement