'ख़ान साहब एक रिक्वेस्ट है', एका शब्दावर किंग खानने तासाभरात पूर्ण केली पाकिस्तानी क्रिकेटरची इच्छा!

Last Updated:

शाहरुख खान बॉलिवूडमध्ये त्याच्या उत्कृष्ट स्वभावासाठी ओळखला जातो. एका पाकिस्तानी क्रिकेटपटूलाही किंग खानने त्याचा चाहता बनवलं आहे. अलीकडेच या क्रिकेटपटूने सांगितले की शाहरुखने एका तासात विमानाची व्यवस्था केली होती. हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घ्या.

News18
News18
Wasim Akram On Shahrukh Khan : शाहरुख खान अनेकदा लोकांना मदत करण्यासाठी ओळखला जातो. पाकिस्तानी क्रिकेटपटू वासिम अक्रमने किंग खानने एका तासात विमानाची व्यवस्था केल्याचा जुना किस्सा सांगितला. शाहरुख खानने हे का केले माहित आहे का? जाणून घ्या.
वासिम अक्रमने मानले शाहरुखचे आभार
शाहरुख खानने वसीमला आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची नोकरीही दिली. यामुळे त्याला त्याच्या ड्रग्जच्या व्यसनापासून सुटका मिळाली. पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम यासाठी शाहरुखचा नेहमीच आभारी आहे. शाहरुखबद्दल वसीम म्हणतो की तो नेहमीच त्याच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येत असतो, क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देत असतो. या संदर्भात बोलताना त्याने आणखी एक किस्सा सांगितला. शाहरुख खानच कौतुक करत त्याने त्याचे आभार देखील मानले.
advertisement
जेव्हा शाहरुख खानने तासाभरात विमानाची व्यवस्था केली
व्हीयू स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने पूर्वीच्या गोष्टींना उजाळा दिला, 'हे 2012 साल असावे, ही घटना आयपीएल हंगामातील आहे. शाहरुख खानच्या टीमला दुसऱ्या दिवशी वेगळ्या ठिकाणी पोहोचायचे होते पण ते वाया वाया गेले असते तर त्यांना पोहोचण्यासाठी दुसरा दिवस लागला असता. तर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना लगेचच तिसऱ्या दिवशी होता. मग मी म्हणालो की जर आजच विमानाची व्यवस्था झाली तर क्रिकेटपटू विश्रांती घेऊ शकतील. अशा परिस्थितीत शाहरुख खानने एका तासात बोईंग विमानाची व्यवस्था केली.' असं वासिम अक्रम म्हणाला.
advertisement
KKR आणि शाहरुख खान
KKR आणि शाहरुख खान यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, 2008 पासूनच या संघाने IPL चा प्रवास सुरु केला. बॉलीवूड स्टार किंग खान या संघाचा मालक असून तो त्याचा संघाला नेहेमीच पाठिंबा देताना दिसून येतो. सध्या KKR प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहे. पण अजूनही आशा कायम आहेत. संघ कसा कमबॅक करणार हे पाहणं महत्वाचं असेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'ख़ान साहब एक रिक्वेस्ट है', एका शब्दावर किंग खानने तासाभरात पूर्ण केली पाकिस्तानी क्रिकेटरची इच्छा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement