Shahrukh On Rinku Singh : शादी कब है? रिंकू सिंगला किंग खानने असं काही विचारलं की, प्रिया सरोजही लाजली!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shah Rukh Khan Ask Rinku Singh On wedding : शाहरूख खानचा लाडका खेळाडू रिंकु सिंग याने देखील ट्विटरवरून शाहरूख खान याला सहा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या.
Shah Rukh Khan On Rinku Singh : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने 2 नोव्हेंबर रोजी त्याचा 60 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी शाहरुखला देश-विदेशातून असंख्य शुभेच्छा मिळाल्या. नेहमीप्रमाणे किंग खान याने सोशल मीडियावर प्रत्येकाला स्वत:हून रिप्लाय दिला. प्रत्येकाला शाहरूख खानने प्रेमळ भाषेत अनेकांना उत्तर दिलं आहे. अशातच शाहरूख खानच्या एका ट्विटने केकेआरच्या क्रिकेटरची बोलती बंद केलीये.
रिंकू, लग्न कधी आहे?
काल बॉलिवूडचा किंग खान याचा 60 वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने अनेक क्रिकेटर्सने तसेच बॉलिवूड सेलिब्रेटींनी किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शाहरूख खानचा लाडका खेळाडू रिंकु सिंग याने देखील ट्विटरवरून शाहरूख खान याला सहा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. बेस्ट एवर हॅप्पी बर्थडे, असं रिंकुने पोस्टमध्ये म्हटलं. त्याला शाहरूख खानने शुभेच्छा दिल्या. थँक्यू रिंकु सिंग... खूप खूप प्रेम... आणि लग्न कधी आहे? असा सवाल शाहरूख खानने विचारला.
advertisement
Thank u Rinku. Lots of love… and shaadi kab hai? https://t.co/2vVclWdVP4
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 4, 2025
प्रिया सरोजशी साखरपुडा
रिंकूने या वर्षी 8 जून रोजी लखनऊमध्ये प्रिया सरोजशी साखरपुडा उरकला. तथापि, लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. प्रिया एक राजकारणी आहे आणि उत्तर प्रदेशातील मच्छली शहर येथून खासदार आहे. रिंकू सिंगशी लग्न झाल्यापासून प्रिया सरोजचे लग्न खूप चर्चेचा विषय ठरले आहे. रिंकू सिंगच्या लग्नाच्या तारखेच्या अनेक बातम्या समोर येत असल्याने किंग खान देखील गोंधळल्याचं पहायला मिळालं. किंग खान याने रिंकूला एक वचन दिलंय, त्यासाठी किंग खानने हा प्रश्न विचारल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
लग्नात नाचण्याचे आश्वासन
दरम्यान, रिंकूने एका मुलाखतीत खुलासा केला की, शाहरुख खानने तिला फोनवरून सांगितले होते की तो तिच्या लग्नात नक्कीच उपस्थित राहील आणि नाचेल. शाहरुख खानने तिच्या लग्नात नाचण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणूनच किंग खानने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये रिंकूला तिच्या लग्नाबद्दल विचारलं, असा अंदाज बांधला जातोय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 8:45 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shahrukh On Rinku Singh : शादी कब है? रिंकू सिंगला किंग खानने असं काही विचारलं की, प्रिया सरोजही लाजली!


