CSK... CSK... शाहरुखने भरमैदानात KKRच्या विजयानंतर दिल्या घोषणा; VIDEO VIRAL

Last Updated:

सामना संपल्यानंतर केकेआरचा मालक शाहरुख खानने चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसोबत मिळून सीएसके सीएसके अशा घोषणा दिल्या.

News18
News18
चेन्नई : आयपीएल २०२४च्या अंतिम सामनन्यात केकेआरने सनरायजर्स हैदराबादला हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर अंतिम सामना झाला. या सामन्यात दहा वर्षांनी पुन्हा एकदा केकेआरने आयपीएलचं विजेतेपद जिंकलं. केकेआरने २०१२ मध्ये चेन्नईच्या याच मैदानावर चेन्नई सुपर किंग्जला हरवून केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली पहिलं विजेतेपद पटकावलं होतं. आयपीएलच्या फायनलवेळी मैदानात चेन्नई सुपर किंग्जचे चाहतेसुद्धा उपस्थित होते. सामना संपल्यानंतर केकेआरचा मालक शाहरुख खानने चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसोबत मिळून सीएसके सीएसके अशा घोषणा दिल्या. याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शाहरुख खानसोबत मैदानावर मुलगी सुहाना आणि मुलगा अबरामसुद्धा दिसत आहेत. शाहरुख खान जेव्हा सीएसके सीएसके अशा घोषणा देतो तेव्हा सुहाना, गौरी खान आणि अबराम हे हसताना दिसतात. सोशल मीडीयावर शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
advertisement
केकेआर जिंकल्यानंतर शाहरुखनच्या त्याची सिग्नेचर पोझ देत आनंद व्यक्त केला, पत्नी गौरी खान, लेक सुहाना, अब्राहम आणि आर्यन खान हे देखील स्टेडिअमवर उपस्थित होते. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय, शाहरुखनं आनंदाच्या भरात लेक सुहानाला मिठी मारली. सुहाना देखील यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर शाहरुखनं आनंदाच्या भरात पत्नी गौरी खानला सर्वांसमोर किस देखील केलं.
advertisement
यंदाच्या आयपीएल हंगामात केकेआरची कामगिरी जबरदस्त अशी होती. २०१४ मध्ये केकेआरने गंभीरच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर यावेळी गौतम गंभीर मेंटॉरच्या भूमिकेत होता. त्याने केकेआरच्या संघाचं वातावरणच बदलूतन टाकलं. परिणामी संघाने कमाल करत आधी लीग फेरीत अव्वल राहिले, त्यानंतर थेट अंतिम फेरी गाठून दणदणीत विजय मिळवला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK... CSK... शाहरुखने भरमैदानात KKRच्या विजयानंतर दिल्या घोषणा; VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement