'तुम्हाला लाज वाटली पाहिजे...', गंभीर आणि आगरकरांच्या स्टेटमेंटवर भडकले नवज्योत सिंग सिद्धू, काय म्हणाले? पाहा

Last Updated:

Navjot Singh Sidhu blast On Fake statement : नवज्योत सिंग सिद्धू यांनी हे विधान आपण केलं नसल्याचं म्हटलं आहे. या फेक स्टेटमेंटवर अनेक कमेंट्स आल्या होत्या.

Navjot Singh Sidhu blast On Fake statement
Navjot Singh Sidhu blast On Fake statement
Indian Cricket Team : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात खराब झाली. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचं एक स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी बीसीसीआयला गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांना हटवण्याची मागणी केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, नवज्योत सिंग सिद्धू यांनी या दाव्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

रोहित शर्माला कॅप्टन्सी सोपवली पाहिजे...

जर टीम इंडियाला 2027 चा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर बीसीसीआयने तातडीने हेड कोच गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर यांना काढून टाकलं पाहिजे आणि रोहित शर्मा याला पूर्ण कॅप्टन्सी सोपवली पाहिजे, असं सिद्धूचं स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. अशातच सिद्धू यांनी हे विधान आपण केलं नसल्याचं म्हटलं आहे. या फेक स्टेटमेंटवर अनेक कमेंट्स आल्या होत्या.
advertisement

तुम्हाला लाज वाटली पाहिजे.... - नवज्योत सिंग सिद्धू

नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण असं वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलं आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, " मी कधीच असं म्हटलं नाही. खोट्या बातम्या पसरवू नका , मला कधीच वाटलं नव्हतं. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. " सिद्धू यांची पोस्ट आता व्हायरल होत आहे.
advertisement

टेलिव्हिजनच्या जगातला हास्याचा आवाज

दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावरचा उत्साह, राजकारणाच्या रस्त्यांवरचा संघर्ष आणि टेलिव्हिजनच्या जगातला हास्याचा आवाज. नवज्योत सिंग सिद्धू यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सिद्धू समालोचनाकडे वळले. त्यांच्या उत्साही, अस्खलित आणि मनोरंजक समालोचन शैलीमुळे त्यांना "सिक्सर सिद्धू" आणि "सरदार ऑफ द कॉमेंट्री बॉक्स" असं टोपणनाव मिळालं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'तुम्हाला लाज वाटली पाहिजे...', गंभीर आणि आगरकरांच्या स्टेटमेंटवर भडकले नवज्योत सिंग सिद्धू, काय म्हणाले? पाहा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement