फ्रॅक्चर असतानाही Rishabh Pant बॅटिंगला का आला? कुणी मैदानात पाठवलं? पत्रकार परिषदेत शार्दुल ठाकूरचा खुलासा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shardul Thakur On Rishabh Pant : सकाळी आम्हाला वाटले की कदाचित ऋषभ फलंदाजी करू शकेल. प्रथम, मला त्याच्या पायाला स्पर्श करावा लागला आणि तो व्यवस्थित चालू शकतो की नाही ते पहावे लागले, असं शार्दुल ठाकूर म्हणालाय.
Rishabh Pant Comeback : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी मॅचमध्ये दुखापतग्रस्त होऊनही टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant Injury) याने केलेल्या अर्धशतकी खेळीने सर्वांनाच थक्क केलं आहे. अंगठ्याला फ्रॅक्चर असताना देखील ऋषभ मैदानात आला अन् टीम इंडियाला तीनशे पार पोहोचवलं. त्याच्या या अविश्वसनीय खेळीवर सहकारी खेळाडू शार्दुल ठाकूरने पत्रकार परिषदेत (Shardul Thakur Press Conference) प्रतिक्रिया दिली आहे. शार्दुलने पंतच्या खेळीचे आणि वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक केलं.
काय म्हणाला शार्दुल?
"मला वाटतं सुरुवातीपासूनच आमचा हाच प्लॅन होता. वैद्यकीय पथकाने खूप मेहनत घेतली आहे. वैद्यकीय पथकाचे खरं तर अभिनंदन... कारण ते पंतला पुन्हा मैदानावर आणू शकले असते. ऋषभ थोडा वेळ फलंदाजी करू शकला असता आणि त्याने ते करून दाखवलं. संघासाठी त्याने काढलेल्या धावा खूप महत्त्वाच्या होत्या", असं ऋषभ म्हणाला आहे.
advertisement
ऋषभला खूप वेदना होत होत्या - शार्दुल ठाकूर
ऋषभच्या वेदनांची कल्पना देत शार्दुल पुढे म्हणाला, "ऋषभला खूप वेदना होत होत्या. आम्ही त्याला अनेक उत्तम गोष्टी करताना पाहिले आहे आणि संघासाठी त्याने केलेली ही आणखी एक अद्भुत गोष्ट होती."
ऋषभच्या पायाला हात लावला अन्...
पंतने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय कसा घेतला, याबद्दल बोलताना शार्दुलने सांगितले, "हा त्याचा आणि वैद्यकीय संघाचा निर्णय होता. सकाळी आम्हाला वाटले की कदाचित तो फलंदाजी करू शकेल. पहिल्यांदा, मला त्याच्या पायाला स्पर्श करावा लागला आणि तो व्यवस्थित चालू शकतो की नाही ते पहावे लागले. जर तो व्यवस्थित चालू शकत असेल, तर आपण पुन्हा फलंदाजीबद्दल बोलू शकतो, असं आमचं ठरलं होतं", असंही शार्दुल ठाकूरने म्हटलं.
advertisement
'Pant has proved that his resilience is unmatched'
Shardul Thakur reflects on India's performance on Day 2, right here #ENGvIND pic.twitter.com/9fMuybnr9B
— Cricbuzz (@cricbuzz) July 24, 2025
दरम्यान, ऋषभ पंतने दुखापत असूनही मैदानावर उतरून संघासाठी केलेल्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 25, 2025 10:30 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
फ्रॅक्चर असतानाही Rishabh Pant बॅटिंगला का आला? कुणी मैदानात पाठवलं? पत्रकार परिषदेत शार्दुल ठाकूरचा खुलासा!


