Mumbai Indians : ज्याची भीती होती तेच झालं! रोहितने हलक्यात घेतलं पण तोच निघाला 'जाएन्ट किलर', पलटणचा खेळ खल्लास

Last Updated:

Punjab Kings into IPL 2025 finals : मुंबई इंडियन्सचं सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यर याने धुळीस मिळलं आहे. श्रेयसने 87 धावांची वादळी खेळी केली.

Shreyas Iyer becomes giant killer For Mumbai Indians
Shreyas Iyer becomes giant killer For Mumbai Indians
Mumbai Indians vs Punjab Kings : आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबई इंडियन्सविरुद्ध एका अविस्मरणीय खेळीने आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. त्याने या निर्णायक सामन्यात केवळ 41 बॉलमध्ये नाबाद 87 धावांची वादळी खेळी केली, ज्यात 5 फोर आणि 8 उत्तुंग सिक्सचा समावेश होता. त्याच्या या कर्णधार खेळीमुळे पंजाबला 204 धावांचं मोठं आव्हान एक ओव्हर शिल्लक असतानाच यशस्वीरित्या पूर्ण करता आलं. श्रेयस अय्यरची खेळी पंजाब किंग्जसाठी निर्णायक ठरली.

रोहितने संधी दिली नाही पठ्ठ्यानं मुंबईला बाहेर काढलं

रोहित शर्माने श्रेयस अय्यरला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळवणं देखील पसंत केलं नव्हतं. तर त्याला टीम इंडियामध्ये गेल्या काही दिवसांपासून संधी देखील मिळाली नाही. तसेच टेस्ट क्रिकेटमध्ये देखील इंग्लंड दौऱ्यात देखील बीसीसीआयने त्याला खेळवणं योग्य समजलं नाही. त्यामुळे आता श्रेयसने आपल्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिलंय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही .प्रेशरखाली खेळताना श्रेयसने दाखवलेले धैर्य आणि मोठे फटके मारण्याची क्षमता यामुळेच त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
advertisement

श्रेयसच्या लिडरशीपची चर्चा

विशेष म्हणजे, श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासात तीन वेगवेगळ्या संघांना (दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज) अंतिम फेरीत नेणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्यामुळे सध्या क्रिडाविश्वात श्रेयस अय्यर या एकाच नावाची चर्चा आहे. श्रेयसच्या लिडरशीपची चर्चा जास्त होताना दिसत नाही. त्याला क्रेडिट देखील मिळत नाही, असं देखील क्रिडातज्ज्ञांनी म्हटलं आहे.
advertisement

श्रेयसचा वर्षभराचा प्रवास

दरम्यान, गेल्या वर्षी बीसीसीआयने श्रेयस अय्यरची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून हकालपट्टी केली होती. त्यानंतर श्रेयस आपला दम दाखवला आणि संधी मिळेल तिथं चमकदार कामगिरी करून दाखवली. केकेआरला आयपीएल जिंकवल्यानंतर मुंबईसाठी श्रेयसने विजय मिळवून दिले. देशांतर्गत क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी केली, ज्यात विजय हजारे ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये प्रभावी धावांचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये बीसीसीआयच्या केंद्रीय करारामधून वगळल्यानंतर, आपल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीमुळे त्याने २०२४-२५ च्या बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत (ग्रेड बी) पुन्हा स्थान मिळवलं.
advertisement
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रीस टोपली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : ज्याची भीती होती तेच झालं! रोहितने हलक्यात घेतलं पण तोच निघाला 'जाएन्ट किलर', पलटणचा खेळ खल्लास
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement