Asia Cup तोंडावर असताना टीम इंडिया धक्का! शुभमन गिल टीममधून बाहेर, अचानक असं काय झालं? गंभीरचा बीपी वाढला

Last Updated:

Shubman Gill out of Duleep Trophy : भारतीय क्रिकेटचा युवा स्टार खेळाडू शुभमन गिल दुलीप ट्रॉफीतून बाहेर पडल्याची बातमी समोर येत आहे. वैद्यकीय टीमने दिलेल्या अहवालानुसार त्याला विश्रांतीचा सल्ला दिला गेलाय.

Team India Vice Captain
Team India Vice Captain
Team India Vice Captain : युएईमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेला (Asia Cup 2025) आता हातावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहे. त्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा देखील झाली असताना भारतीय संघातील स्टार खेळाडू आजारी असल्याचं समोर आलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन शुभमन गिल (Shubman Gill) आहे. शुभमनने आता गौतम गंभीरला टेन्शन दिलंय.

शुभमन गिल दुलीप ट्रॉफीतून बाहेर

भारतीय क्रिकेटचा युवा स्टार खेळाडू शुभमन गिल दुलीप ट्रॉफीतून बाहेर पडल्याची बातमी समोर येत आहे. वैद्यकीय टीमने दिलेल्या अहवालानुसार, गिलची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. गिलला उत्तर विभागाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

9 सप्टेंबरपासून आशिया कप

advertisement
आशिया कप 2025 साठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून गिलची निवड करण्यात आली आहे, त्यामुळे त्याची तब्येत ही टीम इंडियासाठी एक चिंतेची बाब बनली आहे. दुलीप ट्रॉफी 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, तर आशिया कप 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यामुळे, बीसीसीआयने गिलच्या आरोग्याला प्राधान्य देत त्याला या देशांतर्गत स्पर्धेतून बाहेर राहण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement

दुखापतीतून वाचण्यासाठी खेळाडू आजारी

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत आता उत्तर विभागाची जबाबदारी अंकित कुमारकडे सोपवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिलला सध्या व्हायरल तापाचा त्रास होत आहे. तो सध्या चंदीगड येथील त्याच्या घरी आराम करत आहे. आशिया कप सुरू होण्याआधी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. अनेकदा मोठ्या स्पर्धेआधी दुखापतीतून वाचण्यासाठी खेळाडू आजारी पडल्याचं पहायला मिळतंय. शुभमन गिलला देखील याचाच ताप आलाय का? असा सवाल विचारला जात आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup तोंडावर असताना टीम इंडिया धक्का! शुभमन गिल टीममधून बाहेर, अचानक असं काय झालं? गंभीरचा बीपी वाढला
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement