Smriti Mandhana Marriage : 'आमची प्रायव्हसी...', 24 तासानंतर स्मृतीच्या नणंदेने मौन सोडलं, पलाशची बहीण काय म्हणाली?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताची वर्ल्ड कप विजेती क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पोस्टपोन करण्यात आलं आहे. याच्या 24 तासानंतर स्मृतीची होणारी नणंद पलक मुच्छलने मौन सोडलं आहे.
सांगली : भारताची वर्ल्ड कप विजेती क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पोस्टपोन करण्यात आलं आहे. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रविवारी सांगलीमध्ये पार पडणारा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. बॉलिवूड संगीतकार आणि स्मृतीचा होणारा पती पलाश मुच्छल याची बहीण पलक मुच्छालने लग्न स्थगित झाल्याबद्दल अपडेट दिली आहे. पलक मुच्छलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे.
'स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे स्मृती आणि पलाशचं लग्न स्थगित करण्यात आलं आहे. या संवेदनशील वेळी, दोन्ही कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करा', असं आवाहन पलक मुच्छलने केलं आहे.
सांगलीमध्ये रविवार 23 नोव्हेंबरला स्मृती आणि पलाशचं लग्न होणार होतं, पण स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडली यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं निष्पन्न झालं. वडिलांची तब्येत ठीक होत नाही तोपर्यंत लग्न करणार नसल्याचं स्मृतीने सांगितल्याचं तिच्या घरच्यांनी सांगितलं.
advertisement

दुसरीकडे स्मृतीने तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवल्याची वृत्तही समोर आली होती. आता पलाश मुच्छलची बहीण पलक मुच्छलने स्मृती-पलाशच्या लग्नासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. लग्नासाठी दोन्ही कुटुंबाचे सदस्य तसंच भारतीय महिला टीमच्या खेळाडूही सांगलीमध्ये दाखल झाल्या होत्या.
पलाशची प्रकृतीही बिघडली
advertisement
दरम्यान रविवारी संध्याकाळी पलाश मुच्छलची प्रकृतीही बिघडली होती, यानंतर त्याला सांगलीच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही वेळाच्या उपचारानंतर पलाशला डिस्चार्ज देण्यात आला, यानंतर पलाश दुपारी मुंबईमध्ये आला आहे. व्हायरल इनफेक्शन आणि पचनाची समस्या जाणवल्यामुळे पलाशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लग्न पोस्टपोन झाल्यामुळे पलाश मानसिक तणावात आहे, त्यामुळे त्याची तब्येत खराब झाल्याची प्रतिक्रिया पलाशची आई अमिता मुच्छल यांनी दिली आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
November 24, 2025 8:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana Marriage : 'आमची प्रायव्हसी...', 24 तासानंतर स्मृतीच्या नणंदेने मौन सोडलं, पलाशची बहीण काय म्हणाली?


