IND vs SA : 'तो Playing XI मध्ये का नाही?, कोच ऐकत असेल तर...', पराभवानंतर गांगुली गंभीरवर भडकला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. कोलकात्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन मैदानात झालेल्या या सामन्यात 124 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 93 रनवरच ऑलआऊट झाला.
कोलकाता : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. कोलकात्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन मैदानात झालेल्या या सामन्यात 124 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 93 रनवरच ऑलआऊट झाला, ज्यामुळे भारताला 30 रननी पराभव पत्करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर टीका होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुलीने गौतम गंभीरला सुनावलं आहे.
'चांगल्या विकेटवर खेळा, मला आशा आहे की गौतम गंभीर ऐकत असेल. माझ्याकडे त्याच्यासाठी खूप वेळ आहे आणि खूप आदर आहे. तो एक स्पर्धक आहे, त्याने प्रशिक्षक म्हणून भारतासाठी चांगले काम केलं आहे. पण त्याला चांगल्या विकेटवर खेळण्याची गरज आहे. त्याच्याकडे बुमराह आहे, त्याच्याकडे शमी आहे, सिराज आहे. कुलदीप आणि जडेजाही आहे', असं गांगुली म्हणाला.
advertisement
शमीला स्थान मिळावं
टीम इंडियाकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत, मोहम्मद शमीला सिराज आणि बुमराहसह प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवलं पाहिजे, त्याने हे ऐकलं पाहिजे, असा सल्ला गांगुलीने गंभीरला दिला. 'आपल्याला बुमराह, सिराज आणि शमीवर विश्वास ठेवावा लागेल. मला वाटते की शमी या टेस्ट टीममध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे. शमी आणि स्पिनर भारताला टेस्ट मॅच जिंकवतील', असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला आहे.
advertisement
मोहम्मद शमी हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने सक्रिय आहे. पण फिटनेसच्या समस्यांमुळे त्याला टीममध्ये स्थान मिळू शकले नाही. 64 टेस्टमध्ये 229 विकेट घेणाऱ्या शमीने शेवटची टेस्ट 2023 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळली. दरम्यान इडन गार्डनच्या खेळपट्टीवरूनही मोठा वाद निर्माण झाला आहे. टीम मॅनेजमेंटला हवी तशीच खेळपट्टी आम्ही दिल्याचं गांगुली म्हणाला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 5:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 'तो Playing XI मध्ये का नाही?, कोच ऐकत असेल तर...', पराभवानंतर गांगुली गंभीरवर भडकला!


