Sourav Ganguly : 'माझी बदनामी झाली...', सौरव गांगुलीने ठोकला 50 कोटीचा दावा, नेमका कशाने पेटला वाद?

Last Updated:

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने याने 50 कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

'माझी बदनामी झाली...', सौरव गांगुलीने ठोकला 50 कोटीचा दावा, नेमका कशाने पेटला वाद?
'माझी बदनामी झाली...', सौरव गांगुलीने ठोकला 50 कोटीचा दावा, नेमका कशाने पेटला वाद?
मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने याने 50 कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. उत्तम साहा यांच्याविरोधात गांगुलीने कोलकाता येथील लालबाजार येथे तक्रार दाखल केली आहे. गांगुलीचा आरोप आहे की उत्तम साहा यांनी युवा भारती स्टेडियम (सॉल्ट लेक स्टेडियम) घटनेमध्ये जाणूनबुजून आपल्याला गोवलं आहे. तसंच आपल्याविरोधात खोटी, द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक विधानं करून प्रतिष्ठा खराब केली आहे. उत्तम साहा अर्जेंटिना फॅन क्लबचा अध्यक्ष आहे.
दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमादरम्यान सॉल्ट लेक स्टेडियममध्ये गोंधळ उडाला होता. उत्तम साहा यांनी आपल्यावर वारंवार खोटे आरोप केले, ज्यामुळे माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेला धक्का बसला, तसंच सार्वजनिकरित्या चारित्र्य हनन झालं, असं गांगुली त्याच्या तक्रारीत म्हणाला आहे. उत्तम साहा यांनी जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर आरोप केले, असा दावाही गांगुलीने केला आहे.
याप्रकरणी सौरव गांगुलीने साहा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे तसंच 50 कोटींचा मानहानीचा दावाही दाखल केला आहे. उत्तम साहा यांच्या आरोपांना तथ्यात्मक आधार नाही, असंही गांगुली नोटीसमध्ये म्हणाला आहे.
advertisement

गांगुली कार्यक्रम सोडून निघून गेला

घटनेच्या दिवशी सौरव गांगुली सॉल्ट लेक स्टेडियममध्ये उपस्थित होता, पण तो गोंधळानंतर निराश होऊन निघून गेला. गांगुलीनी असेही स्पष्ट केले की तो फक्त पाहुणा म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होता आणि त्याचा लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नव्हता.
सौरव गांगुलीच्या वकिलांनी सांगितले की हा खटला त्याच्या सार्वजनिक प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आणि भविष्यात असे खोटे आरोप रोखण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. अर्जेंटिना फॅन क्लबचे अध्यक्ष उत्तम साहा यांनी केलेल्या आरोपांमुळे गांगुलीच्या प्रतिमेवर आणि वैयक्तिक प्रतिष्ठेवर लक्षणीय परिणाम झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sourav Ganguly : 'माझी बदनामी झाली...', सौरव गांगुलीने ठोकला 50 कोटीचा दावा, नेमका कशाने पेटला वाद?
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement