IND vs SA : पाच खेळाडूंवरचं प्रेम टीम इंडियाला पडलं भारी! साऊथ अफ्रिकेकडून मालिकेत 2-0 ने क्लिन स्वीप
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
South Africa Clean Sweep Team India : साऊथ अफ्रिकेकडून टीम इंडियाच्या वाघांची भारतात शिकार करण्यात आली आहे. टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना देखील गमावला आहे.
South Africa Beat Team India : कोलकाता कसोटीनंतर आता गुवाहाटी कसोटीमध्ये देखील टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. साऊथ अफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया 408 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. साऊथ अफ्रिकने पहिल्या डावात 489 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाचा डाव 201 धावांवर गडबडला. त्यानंतर 260 धावा करून साऊथ अफ्रिकेने आपला डाव जाहीर केली होता. पण टीम इंडियाला 500+ धावा चेस करता आल्या नाहीत. दुसऱ्या डावात टीम इंडिया 140 धावांवर कोसळली.
भारताचा घमंड मोडला
साऊथ अफ्रिकेसाठी सायमन हार्मेर आणि मार्को यान्सर दोघं विजयाचे शिल्पकार ठरले. दुसऱ्या कसोटीत भारताला 408 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी ऐतिहासिक मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेने 25 वर्षांपूर्वी मिळवलेल्या कामगिरीचा विक्रम करत भारताचा सर्वात मोठा घमंड मोडला. दक्षिण आफ्रिका हा घरच्या मैदानावर भारताला दोनदा क्लीन स्वीप करणारा पहिला संघ ठरला. यापूर्वी, 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 2-0 ने हरवले होते.
advertisement
South Africa win the 2nd Test by 408 runs.
They also clinch the #INDvSA Test Series by 2-0.
Scorecard https://t.co/Hu11cnrocG#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/NBSFW4xtxP
— BCCI (@BCCI) November 26, 2025
advertisement
गंभीरच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
टीम इंडियामध्ये नक्कीच चाललंय काय? असा सवाल विचारला जात आहे. टीम इंडियामधील ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. टीम इंडियामध्ये आधीच अनुभवची कमतरता असल्याने गंभीरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
advertisement
दक्षिण आफ्रिका : एडेन मार्कराम, रायन रिकल्टन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्गी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (विकेटकीपर), सायमन हार्मर, केशव महाराज, मार्को जानसेन, सेनुरन मुथुसामी.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 12:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : पाच खेळाडूंवरचं प्रेम टीम इंडियाला पडलं भारी! साऊथ अफ्रिकेकडून मालिकेत 2-0 ने क्लिन स्वीप


