IND vs SA : टीम इंडियाची माफी मागायलाही तयार नाही साऊथ अफ्रिकेचा कोच, म्हणाला 'पश्चाताप होतोय पण...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shukri Conrad clarifies On Grovel : मी कधीही कोणाशीही वाईट वागण्याचा किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल अहंकारी होण्याचा हेतू नव्हता, असं शुक्री कॉनराड यांनी म्हटलं आहे.
South African head coach Shukri Conrad : भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील झालेल्या कसोटी मालिकेत साऊथ अफ्रिकेचा वरचष्मा पहायला मिळाला. साऊथ अफ्रिकेने टीम इंडियाचा 2-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गुवाहाटी टेस्टच्या चौथ्या दिवसानंतर शुक्री यांनी Grovel शब्दाचा उल्लेख केला होता. ज्याचा अर्थ टीम इंडियाला गुडघ्यावर आणणे असा होतो. त्यावर आता त्यांनी वनडे मालिकेनंतर यावर स्पष्टीकरण दिलं, पण त्यांनी यावेळी माफी मागितली नाही.
काय म्हणाले शुक्री कॉनराड?
मी कधीही कोणाशीही वाईट वागण्याचा किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल अहंकारी होण्याचा हेतू नव्हता, असं शुक्री कॉनराड यांनी म्हटलं आहे. माझा अर्थ असा होता की भारताने मैदानावर अधिक वेळ घालवावा आणि त्यांच्यासाठी ते खूप कठीण असावं, असा माझा अर्थ होता. याचा नक्कीच पश्चाताप होतोय, असं शुक्री कॉनराड यांनी स्पष्ट केलं आहे. आता, मी कोणते शब्द वापरतो याबद्दल मला काळजी घ्यावी लागेल, कारण ते संदर्भानुसार असू शकतात, असंही शुक्री कॉनराड यावेळी म्हणाले आहेत.
advertisement
रणनिती कशी होती?
पत्रकार परिषदेत बोलताना साऊथ अफ्रिकन कोचने टीम इंडियाविरुद्ध रणनिती कशी होती? यावर खुलासा केला आहे. आम्हाला असं वाटत होतं की त्यांनी खरोखरच अस्वस्थ व्हावं, जसं की तशी म्हण आहे. त्यांना पूर्णपणे खेळाबाहेर काढा आणि नंतर त्यांना आज संध्याकाळी शेवटच्या दिवशी आणखी एक तास थांबण्यास सांगा अशी रणनिती असते, असंही शुक्री यांनी म्हटलं.
advertisement
टी-20 मालिकेवर लक्ष
दरम्यान, कसोटी मालिका अधिक चांगली झाल्याने एकदिवसीय मालिका अधिक मनोरंजक झाली असती आणि विशेषतः आता भारताने ती मालिका जिंकली आहे, त्यामुळे टी-20 मालिका आणखी रोमांचक होईल. आमचं त्यावर लक्ष आहे, असं कोच शुक्री यांनी म्हटलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 7:16 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : टीम इंडियाची माफी मागायलाही तयार नाही साऊथ अफ्रिकेचा कोच, म्हणाला 'पश्चाताप होतोय पण...'


