SRH vs DC : पावसामुळे काव्या मारनचा हार्टब्रेक!चेन्नई, राजस्थान नंतर 'हा' संघ प्लेऑफमधून बाहेर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
SRH vs DC : सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघातील आजचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे.त्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला आहे.
SRH vs DC : सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघातील आजचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे.त्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला आहे.यामुळे हैदराबादचे आव्हान संपुष्ठात आले आहे.तर दिल्ली अजून स्पर्धेत कायम आहे.
हैदराबाद आणि दिल्ली संघात होणारा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघाला एक-एक गुण देण्यात आला आहे. याचा सर्वांधिक फटका हैदराबादला बसला आहे.कारण या स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्ठात आले आहे.
हैदराबाद 10 सामन्यात 6 गुणांसह नवव्या क्रमांकावर होता. त्यांना त्यांचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे गरजेचे होते. पण आजचा सामना रद्द झाल्याने त्यांचे गुण 7 झाले आहेत. आता उर्वरीक तीन सामने जिंकूनही त्यांचे जास्तीत जास्त 13 गुण होतीत.त्यामुळे ते असेही प्लेऑफमध्ये पोहोचू शकत नाही. तसेच यापुर्वीच 4 संघानी 14 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. त्यामुळे हैदराबादचे आव्हान संपेल.
advertisement
दिल्ली कॅपिटल्सने 10 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचे 12 गुण होते. पण सामना रद्द झाल्यानंतर त्यांचे १३ गुण होतील. त्यामुळे त्यांनाही प्लेऑफमध्ये पोहचायचे असेल, तर आगामी तिन्ही सामने जिंकावेच लागतील. जर असे झाले, तर ते जास्तीत जास्त 13 गुण मिळवू शकतात.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन):
अभिषेक शर्मा, इशान किशन (w), सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, एशान मलिंगा
advertisement
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन):
फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (डब्ल्यू), अक्षर पटेल (क), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी नटराजन
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 05, 2025 11:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH vs DC : पावसामुळे काव्या मारनचा हार्टब्रेक!चेन्नई, राजस्थान नंतर 'हा' संघ प्लेऑफमधून बाहेर