Team India : संजू टीममध्ये, पण ओपनर नाही, आशिया कपसाठी गावसकरांनी निवडली भारताची Playing XI
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा झाली. टीम इंडियामध्ये शुभमन गिलचे पुनरागमन झाल्यामुळे संजू सॅमसनच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मुंबई : आशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा झाली. टीम इंडियामध्ये शुभमन गिलचे पुनरागमन झाल्यामुळे संजू सॅमसनच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी स्पष्टपणे संकेत दिले की गिल टीमसाठी ओपनिंगला खेळू शकतो आणि अभिषेक शर्मा त्याचा साथीदार असू शकतो. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने स्पष्टपणे सांगितले की संजू सॅमसन भारताच्या सुरुवातीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यास पात्र नाही. पण भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे मत वेगळे आहे. त्यांनी संजू सॅमसनला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे.
आशिया कप 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळला जाणार आहे. या टी-20 स्पर्धेसाठी सुनील गावसकर यांनी त्यांची प्लेइंग इलेव्हन शेअर केली आहे. गावसकर यांच्या या प्लेइंग इलेव्हनने अनेक क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकित केलं आहे, कारण त्यांनी संजू सॅमसनला मिडल ऑर्डरमध्ये स्थान दिले आहे. गावसकर यांनी संजूला मिडल ऑर्डरमध्ये स्थान देण्याचे कारण देखील स्पष्ट केले. त्यांनी 'स्पोर्ट्स तक'ला सांगितले की, सामन्याच्या परिस्थितीनुसार संजू सॅमसनचा बॅटिंग क्रम बदलू शकतो, ज्याचा टीमला फायदा होईल.
advertisement
अजित आगरकरने टीमची घोषणा केली तेव्हा विकेट कीपर जितेश शर्माचे नाव प्रथम घेतले, यानंतर संजू सॅमसनचे नाव घेण्यात आले. निवड समितीने निवडलेल्या टीममध्ये विकेट कीपर म्हणून जितेश शर्मा ही पहिली पसंती असल्याचे हे एक प्रकारचे संकेत मानले जात आहेत. याआधी 2023 साली शेवटचा आशिया कप खेळला गेला होता, जो भारताने जिंकला होता. भारत 10 सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध स्पर्धेत आपली मोहीम सुरू करेल. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल.
advertisement
सुनील गावसकरांची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेट कीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
आशिया चषक 2025 साठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्सर पटेल, जितेश शर्मा (विकेट कीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेट कीपर), हर्षीत राणा, रिंकू सिंग
advertisement
स्टॅण्ड बाय खेळाडू
प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 20, 2025 11:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : संजू टीममध्ये, पण ओपनर नाही, आशिया कपसाठी गावसकरांनी निवडली भारताची Playing XI










