advertisement

Sunil Gavaskar : केक घेऊन आलेल्या मायकल वॉनला गावसकरांनी शिकवली भारतीय संस्कृती, लॉर्ड्सवर घडलं तरी काय? Video

Last Updated:

भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांचा गुरूवारी वाढदिवस होता. 10 जुलै 1949 ला जन्मलेल्या सुनिल गावसकर यांनी 76व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

केक घेऊन आलेल्या मायकल वॉनला गावसकरांनी शिकवली भारतीय संस्कृती, लॉर्ड्सवर घडलं तरी काय? Video
केक घेऊन आलेल्या मायकल वॉनला गावसकरांनी शिकवली भारतीय संस्कृती, लॉर्ड्सवर घडलं तरी काय? Video
लंडन : भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांचा गुरूवारी वाढदिवस होता. 10 जुलै 1949 ला जन्मलेल्या सुनिल गावसकर यांनी 76व्या वर्षात पदार्पण केलं आहे. भारत-इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजमुळे सुनिल गावसकर सध्या इंग्लंडमध्ये आहेत. या सीरिजमध्ये गावसकर कॉमेंट्री करत आहेत. भारत-इंग्लंड यांच्यातल्या लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी कॉमेंट्री बॉक्समध्ये गावसकरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन याने सुनिल गावसकर यांच्यासाठी खास केक बनवला होता. मी टेस्ट मॅच खेळत असताना किंवा कॉमेंट्री करत असताना, मी इतके वेळा इंग्लंडला आलो आहे, कधीही माझा वाढदिवस आला नव्हता, त्यामुळे हा दिवस खूपच खास आहे, अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली आहे.
भारतीय खेळाडू बर्थडे सेलिब्रेशन करताना केक तोंडावर लावतात, असं मी आयपीएलमध्ये बघितलं आहे. तुम्हालाही असंच सेलिब्रेशन करायचं आहे का? असा प्रश्न मायकल वॉनने गावसकरांना विचारला, ज्यावर गावसकरांनी नाही असं उत्तर दिलं. पुढे केक कापण्यासाठी मायकल वॉनने गावसकरांना चाकू दिला, पण यानंतर गावसकरांनी मायकल वॉनला भारतीय संस्कृती सांगितली.
advertisement
advertisement
भारतामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हातात चाकू देत नाही, त्यामुळे चाकू टेबलवर ठेव, मी तो उचलतो, असं गावसकरांनी मायकल वॉनला सांगितलं, त्यानंतर मायकल वॉनने चाकू टेबलवर ठेवला. हा चाकू गावसकरांनी उचलला आणि त्यांच्या वाढदिवसाचा केक कापला. सुनिल गावसकर यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच अनेक जण गावसकर यांचं भारतीय संस्कृतीची आठवण ठेवल्याबद्दल कौतुक केलं आहे.
advertisement
भारताच्या अनेक भागांमध्ये एक व्यक्ती दुसऱ्याच्या हातात चाकू किंवा कात्री देत जात नाही, तर त्याऐवजी चाकू आणि कात्री खाली ठेवून दुसऱ्या व्यक्तीला घ्यायला सांगितली जाते. चाकू किंवा कात्री हातात दिल्याने दोन व्यक्तींमध्ये वाद आणि भांडणं होतात, असं मानलं जातं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sunil Gavaskar : केक घेऊन आलेल्या मायकल वॉनला गावसकरांनी शिकवली भारतीय संस्कृती, लॉर्ड्सवर घडलं तरी काय? Video
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement