T20 World Cup 2026: आगरकर धडधडीत खोटं बोलला? सूर्याने सांगितलं शुभमनला वगळण्याचं खरं कारण, म्हणाला 'आम्हाला टीममध्ये...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar on Shubhman Gill omission : सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, शुभमन गिलची खराब कामगिरी त्याच्या निवडीत अडथळा ठरली आहे.
Shubhman Gill omission From T20 World Cup 2026 : बीसीसीआयने शनिवार आगामी आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला, ज्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, टी-20 संघात भारताचा उपकर्णधार असलेल्या शुभमन गिलला संघातून वगळण्यात आलं आहे. ऑलराऊंडर अक्षर पटेलची नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशातच आता सूर्यकुमार यादवने शुभमन गिलला वगळल्याचं वेगळंच कारण सांगितलंय.
आम्हाला नव्या उपकर्णधाराची गरज होती - अजित आगरकर
सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, शुभमन गिलची खराब कामगिरी त्याच्या निवडीत अडथळा ठरली आहे. आगरकर म्हणाले की, "शुभमन गिल नक्कीच चांगला प्लेयर आहे. पण गिलकडे सध्या धावांची कमतरता होती आणि जेव्हा त्याची निवड झाली नाही, तेव्हा आम्हाला नव्या उपकर्णधाराची गरज होती. टीममध्ये कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे." असं आगरकर म्हणाला. पण दुसरीकडे सूर्याने शुभमन गिलला वाचवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
टॉप ऑर्डरवर खेळणारा विकेटकीपर हवा होता - सूर्यकुमार
शुभमन गिलला त्याच्या खराब फॉर्ममुळे वगळण्यात आलं नाही तर त्याची टीममध्ये जागा तयार होत नव्हती. शुभमन गिलच्या जागी आम्हाला टॉप ऑर्डरवर खेळणारा विकेटकीपर हवा होता, असं म्हणत सूर्यकुमारने शुभमन गिलच्या फॉर्मवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. टीम इंडियामध्ये इशान किशनची एन्ट्री झाली असून ऋषभ पंतला देखील जागा मिळाली नाही.
advertisement
शुभमन गिलला फॉर्म चिंतेचा विषय
दरम्यान, भारतासाठी डावाची सुरुवात केल्यापासून शुभमन गिलला फॉर्म मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. व्यवस्थापनाच्या दीर्घकालीन नेतृत्वाच्या योजनेचा भाग म्हणून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये परत आणण्यात आले होते, परंतु त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पुनरागमनानंतरच्या 15 टी-20 सामन्यांमध्ये गिलने 24.25 च्या सरासरीने आणि 137 च्या स्ट्राइक रेटने 291 धावा केल्या आहेत, ज्यात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 3:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026: आगरकर धडधडीत खोटं बोलला? सूर्याने सांगितलं शुभमनला वगळण्याचं खरं कारण, म्हणाला 'आम्हाला टीममध्ये...'









