श्रेयस अय्यर गेल्या दोन वर्षापासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्रेयस अय्यरने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली होती. तर पंजाब किंग्जसाठी श्रेयसने अफलातून कामगिरी केली होती. मात्र, आशिया कपसाठी श्रेयसला संधी मिळाली नाही. अशातच आता ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि टी-ट्वेंटी मालिकेसाठी श्रेयस अय्यरला संधी दिली जाणार का? असा सवाल विचारला जात आहे.
निवड बैठकीचा निर्णायक मुद्दा म्हणजे एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधारपद – विशेषतः रोहितला कर्णधारपदी कायम ठेवायचं की नाही. निवडकर्त्यांनी त्याच्याशी थेट चर्चा करण्याची योजना आखली जाणार आहे. दरम्यान, रोहितने अलीकडेच बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली होती. त्यामुळे तो टीम इंडियाचं नेतृत्व सांभाळू शकतो.
टीम इंडियाचा वनडे कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्यावर चर्चेला उधाण आलं आहे. त्याला कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होत असलेली टीम इंडियाची निवड. 19 ऑक्टोबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आज होणार आहे. अशातच आता सर्वांची नजर टिकलीये ती दोन सुपरस्टारवर… पण रोहित शर्मासोबत ओपनिंगला कोण येणार? हा प्रश्न कायम राहिला आहे.
वन डेटी कॅप्टन्सी रोहित शर्माकडे राहणार की कोणी बदलणार यावर अजून टांगती तलवार आहे. पण सध्या रोहितकडे राहील अशी अपेक्षा आहे. मात्र याबाबत आज फैसला येणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या मिटिंगकडे लागलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्याचा अनुभव महत्त्वाचा असेल. शुभमन गिललाही संधी मिळणार की बाहेर बसावं लागणार याचा निर्णय देखील आज होणार आहे.
आशिया कपनंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. त्यासाठी आज दुपारी महत्त्वाची बैठक होणार असून टीम जाहीर केली जाईल. आशिया कपमधील घवघवीत यशानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसून तयार सुरू झाली आहे. कांगारुंना शह देण्यासाठी टीममध्ये कोणाला संधी मिळणार ते पाहावं लागणार आहे.