फॅन्सच्या डिमांडवर मारायचा सिक्स,निवृत्तीनंतर बॉलिवूडही गाजवलं, कोण आहे स्टार क्रिकेटर?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
प्रेक्षकांच्या डिमांडवर हा खेळाडू सिक्स मारायचा.प्रेक्षक जिथून सिक्सर मारायची मागणी करायचा तिथे हा खेळाडू सिक्स मारायचा. त्यामुळे प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन व्हायचे.
Salim Durani Story : टीम इंडियात आतापर्यंत अनेक खेळाडू होऊन गेले आहेत. या खेळाडूंनी आपआपल्या टॅलेंटच्या बळावर क्रिकेट वर्तुळात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पण या सर्वांत एक खेळाडू खूपच वेगळा होता. प्रेक्षकांच्या डिमांडवर हा खेळाडू सिक्स मारायचा.प्रेक्षक जिथून सिक्सर मारायची मागणी करायचा तिथे हा खेळाडू सिक्स मारायचा. त्यामुळे प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन व्हायचे. दरम्यान पुढे जाऊन याच खेळाडूने निवृत्तीनंतर बॉलिवूडही गाजवलं होतं?त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण होता? हे जाणून घेऊयात.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी भारताचा दिग्गज सलीम दुर्राणी आहे. सलीम दुर्राणी हा धडाकेबाज फलंदाज होता. दुर्राणी एकदा क्रिजवर सेट झाला तर आपलं शतक होणार की नाही याकडे लक्षही द्यायचा नाही आणि बिनधास्त खेळायचा. सलीम दुर्राणीच्या फलंदाजीची खासियत बोलायची झाली तर ते क्रिकेट फॅन्सच्या डिमांडवर ते सिक्स मारायचे. प्रेक्षक मैदानाच्या ज्या ठिकाणाहुन 'We Want Sixer' चा नारा द्यायचे.त्या ठिकाणावर ते सिक्स मारायचे.यामुळे दुर्राणींच्या बॅटींगमुळे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन व्हायचे.
advertisement
1960-70 च्या दशकात ते भारतीय संघातले सर्वांत हँडसम क्रिकेटर होते. त्यामुळे त्यांना बघायला अख्खं स्टेडिअम खचाखच भरलेले असायचे.सलीम दुर्राणींच्या बॅटींगची खासियत अशी होती की क्रिकेट फॅन्स ज्या ठिकाणाहून सिक्सर मारायची डिमांड करायचे त्या ठिकाणी ते सिक्सर मारायचे. त्यामुळे अशाप्रकारे दुर्राणी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करायचे.
क्रिकेट कारकिर्द
सलीम दुर्रानी यांचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झाला होता. जेव्हा ते आठ महिन्यांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंब काबूलहून कराचीला स्थलांतरित झाले. नंतर, देशाच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. त्यांनी भारतासाठी 29 कसोटी सामने खेळले आणि या काळात त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.
advertisement
डावखुरा फलंदाज असलेल्या दुर्रानी यांनी 29 कसोटी सामन्यांमध्ये 1 हजार 202 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश होता. त्यांनी फिरकी गोलंदाजी देखील केली. त्यांनी गोलंदाजीत 10 विकेटस घेतल्या होत्या. यासोबत देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील त्यांनी लक्षणीय धावा आणि विकेट घेतल्या होत्या. 170 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी 33.37 च्या सरासरीने 8 हजार 545 धावा (14 शतके) केल्या आणि 26.09 च्या सरासरीने 484 बळी घेतले.
advertisement
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आले चर्चेत
सलीम दुर्रानी यांनी 1964 मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा केला.या मालिकेतील चौथ्या कसोटीत त्यांनी एक उल्लेखनीय खेळी केली जी अविस्मरणीय ठरली. पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत यजमान वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 444 धावा केल्या. या प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 197 धावांवर गडगडला.त्यानंतर भारताचा पराभव जवळजवळ निश्चित झाला होता. पण वेस्ली हॉल, लान्स गिब्स आणि गॅरी सोबर्स सारख्या भयानक गोलंदाजांचा सामना करताना सलीम दुर्राणी यांनी लवचिकता दाखवली आणि दुसऱ्या डावात मौल्यवान 104 धावा केल्या आणि पॉली उम्रीगर (172) सोबत, त्यांनी भारताच्या दुसऱ्या डावातील धावसंख्या 422 पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर भारताने वेस्ट इंडिजसाठी 176 धावांचे लक्ष्य ठेवले, जे त्यांनी फक्त 3 गडी गमावून साध्य केले.पण ही कसोटी अजूनही दुर्रानी आणि उम्रीगरच्या उत्साही खेळीसाठी लक्षात ठेवली जाते.
advertisement
निवृत्तीनंतर बॉलिवूडमध्ये एंन्ट्री
view commentsसलीम दुर्राणी यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना 1973 मध्ये खेळला.त्यांना भारत सरकारने प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, परंतु चित्रपटसृष्टीत त्यांना यश मिळू शकले नाही. 1973 मध्ये "चरित्र" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात दुर्राणी यांनी परवीन बाबी यांच्यासोबत भूमिका केली होती.पण हा चित्रपट फारसा चालला नाही.नंतर 2023 मध्ये दुर्राणी यांचे गुजरातमध्ये निधन झाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 5:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
फॅन्सच्या डिमांडवर मारायचा सिक्स,निवृत्तीनंतर बॉलिवूडही गाजवलं, कोण आहे स्टार क्रिकेटर?


