The Ashes Test : ऑस्ट्रेलियाने 5 बॉलमध्ये काढली इंग्लंडच्या बॅझबॉलची हवा! स्टार्कसह बोलंडचा कहर, पाहा Video

Last Updated:

Australia vs England 1st Test : पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडने डाव सांभाळला होता. मात्र, लंच ब्रेकनंतर इंग्लंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला.

The Ashes Test Australia clean up England
The Ashes Test Australia clean up England
Australia vs England 1st Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात प्रसिद्ध अ‍ॅशेस कसोटी मालिका खेळवली जात आहे. यावेळेस ही मालिका ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असून पहिलाच सामना पर्थच्या मैदानावर खेळवला जात आहे. या पहिल्या कसोटीत बॉलर्सचा दबदबा पहायला मिळाला आहे. पर्थवर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 172 धावांवर गुंडाळल्यानंतर इंग्लंडने देखील 132 धावांवर ऑस्ट्रेलियावर ऑलआऊट केलं. तर आता ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सने पुन्हा आग ओकली असून इंग्लंडचा 76 धावांवर पाच विकेट्स गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने फक्त 5 बॉलमध्ये इंग्लंडची हवा काढली.

लंच ब्रेकनंतर इंग्लंडचा डाव कोसळला

40 धावांची लीड घेतल्यानंतर इंग्लंडची दुसऱ्या डावातील परिस्थिती पहिल्या डावासारखी झाली आहे. पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडने डाव सांभाळला होता. मात्र, लंच ब्रेकनंतर इंग्लंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला. 76/2 अशी 19 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडची परिस्थिती होती. तिथून 76/5 अशी परिस्थिती इंग्लंडची झाली. स्कॉट बोलंड आणि मिचेल स्टार्क यांनी आक्रमक बॉलिंग करत इंग्लंडला गुडघ्यावर टेकवलं आहे.
advertisement
advertisement

148 वर्षांच्या कसोटी इतिहासात...

advertisement
अॅशेसच्या पहिल्याच दिवशी 19 विकेट्स पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पण यादरम्यान असा एक विक्रम झाला आहे, जो आजवरच्या 148 वर्षांच्या कसोटी इतिहासात कधीच झाला नव्हता. पर्थ कसोटीत रचलेला हा विक्रम दोन्ही संघांसाठी केवळ चिंतेचा विषय नाही तर पहिल्या कसोटीत गोलंदाजांनी वर्चस्व गाजवल्यामुळे या मालिकेत फलंदाज अडचणीत येण्याचे संकेत देखील आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
The Ashes Test : ऑस्ट्रेलियाने 5 बॉलमध्ये काढली इंग्लंडच्या बॅझबॉलची हवा! स्टार्कसह बोलंडचा कहर, पाहा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement